<
जळगांव-(प्रतिनिधी)-दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी जळगांव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागातंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य संपर्क अधिकारी, विशेष कार्य अधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मुंबई येथील मा. प्राचार्य डॉ. अतुल साळंखे हे प्रमुख व्यक्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. जी. महाजन , संचालक रासोयो प्रादेशिक संचालनालय बेंगलुरू येथील डॉ. कार्तिकेयन, कबचौ उमवि येथील रासोयो विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नावरे, महाविद्यालयाचे रासोयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन बडगुजर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड साह्ययक कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश चौधरी, उन्नत भारत अभियानाचे समन्वयक प्रा. जुगल घुगे हे मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात प्रास्ताविकाने डॉ. नितीन बडगुजर यांनी करीत धनाजी नाना चौधरी संस्था महाविद्यालय समाजाकार्य अभ्यासक्रमाची माहिती दिली. प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी आपल्या मनोगतात व्यावसायिक समाजकार्याच्या अभ्यासक्रम आणि क्षेत्रकार्यातंर्गत उपक्रमांचे कौतुक करीत राष्ट्रीय सेवा योजनेतुन निर्माण होणारे युवकांचे उदाहरण देत पोपटराव पवार हे रासोयो चे एकक होते. श्रम संस्कार, शिस्त व अनुशासन, संघटन, राष्ट्रभक्ती या सारख्या विविध पैलु हे विद्यार्थी आत्मसात करतात आणि त्या सोबतच व्यावसायिक समाजकार्याचा विद्यार्थी जर तो असेल तर तो नक्कीच राष्ट्र विकासाचे धैय्य डोळ्यासमोर ठेवुन समाज विकास करण्यासाठी तत्पर असेलच म्हणुन मला आज या महाविद्यालयात येवुन समाजकार्य महाविद्यालय हे एन.एस. एस. चे रोल मॉडेल होवुन पुढे यावे हि मनस्वी ईच्छा मी आज या ठिकाणी प्रकट करतो आणि तुम्हाला सर्वांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतानां क्षेत्रकार्यांतंर्गत ग्रामिण विकासात विद्यार्थ्यांच्या उपक्रमांबाबत बोलत असतांना केंद्राचे उन्नत भारत अभियानांर्गत दत्तक गांवा मध्ये झालेल्या कामाची माहिती दिली आणि भविष्यात डॉ. अतुल साळुंखे सर रासोयो मंत्रालय कक्ष मुंबई यांनी काही महत्वपुर्ण जबाबदारी यांनी व्यक्त केलेली भावना भविष्यात नक्कीच पुर्ण होईल हा विश्वास देतो आणि आलेल्या पाहुण्यांनी वेळात वेळ काढुन आमच्या महाविद्यालयाला भेट दिली त्या बद्दल मी आभार मानतो. कोल्हापुर येथील पुरग्रस्तांना कबचौ उमवि जळगांव येथील रासोयो विभागातुन ६८ विद्यार्थ्यांनी २५ घरांचे पुर्नवसन केले या उत्कृष्ठ कामाचा अनुभव मनोगतातुन रासोयो एकक रितेश चौधरी यांनी केले. नुकतेच २४ सप्टेंबर रोजी सुवर्ण मोहोत्सवाची छान रांगोळी रासोयो एकक लिना जगताप , वैष्णवी खैरनार , अर्चना सुर्यवंशी , दिपाली चव्हाण , जयश्री ठाकुर , योगेश वाडेकर , रितेश चौधरी यांनी काढली. आलेल्या पाहुण्यांनी रांगोळी समोर उभे राहुन छायाकंन केले.सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन रासोयो एकक लिना जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड साह्ययक कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश चौधरी शिक्षकेतर कर्मचारी राजकुमार पवार यांनी केले परिश्रम घेतले.