<
मुंबई- आता फुकट्या प्रवाशांवर फुकट प्रवास करताना चाप बसणार आहे. कारण मध्य रेल्वेनं फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर चाप बसविण्यासाठी किंवा त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे.जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
रेल्वे प्रवाशांनो जर तुम्ही दररोज रेल्वेनं प्रवास करत असाल ती ही बातमी नक्की वाचा. आता फुकट्या प्रवाशांवर फुकट प्रवास करताना चाप बसणार आहे. कारण मध्य रेल्वेनं फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर चाप बसविण्यासाठी किंवा त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळं आता रेल्वेनं प्रवास करताना प्रवाशांवर चाप बसणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सुरळीत आणि पारदर्शक तिकीट तपासणी सुनिश्चित करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बॉडी कॅमेऱ्यांसह SBI YONO ॲपद्वारे प्रवाशांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी UPI/QR कोड पेमेंट सिस्टम सुरू करून नवीन तिकीट तपासणी उपक्रम सुरू केली आहे.तिकीट तपासणीत अधिक पारदर्शकता यावी यासाठी मध्ये रेल्वेकडून नवीन प्रणाली आणण्यात आली आहे.
SBI YONO ॲप प्रवाशांना UPI/QR कोड प्रणालीद्वारे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना पेमेंट करण्यास मदत करेल. जे रोख हाताळणी कमी करेल आणि डिजिटल इंडिया मिशनच्या जाहिरातीनुसार संरक्षित आणि सुरक्षित व्यवहार देखील प्रदान करेल. तसेच दि. ३मे २०२३ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर नवीन नूतनीकरण केलेल्या टीटीई रनिंग रूमचे उद्घाटन केले आहे.