<
पोलीस पाटील ही महसूल यंत्रणेतील गाव पातळीवरील महत्त्वाची उपदे आहेत. महसूल विभागासह कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस पाटील पद महत्त्वाचे मानले जाते.
मात्र जिल्ह्यात या पदांचा मोठा अनुशेष आहे. पोलीस पाटलांची ८२२ पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. त्याचा मोठा ताण महसूल यंत्रणेवर पडत आहे.पोलीस पाटील पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू केले जाणार माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. त्याची जाहिरात १५ मे रोजी प्रसिद्ध होईल.
अर्ज करण्यासाठी १६ ते २६ मे, अर्जांची छाननी दि. २९ ते ३० मे, पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ५ जून (संबंधित उपविभागीय कार्यालय), पात्र उमेदवारास प्रवेशपत्र देणे ८ ते १२ जून, लेखी परीक्षा दि. १५ जून सकाळी ११ ते १२, उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे दि. २० जून, उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची छाननी २२ जून, तोंडी परीक्षा दि. २७ जून, सकाळी ११ वा. पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी ३० जूनला प्रसिद्ध होईल (संबंधित उपविभागीय कार्यालय).