<
चाळीसगाव(प्रतिनीधी)- पितृपक्ष पंधरवडा दिनांक २८ रोजी संपत असून आपल्या वाडवडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी जोपासणारे आणि उपक्रम राबवणारे सेवाभावी हात अजूनही समाजात असल्याची प्रचिती येते. चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले कुंझर या सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या गावात संपूर्ण ग्रामस्थांचे आवडते व हवेहवेसे वाटणारे आदर्श शिक्षक स्वर्गीय तात्यासो रमेश सहादु पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा शिक्षक संघटनेच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी कुंझर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला व त्याच आवारातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर श्री शनेश्वर मंदिर यांना दिमाखदार शोभणारे भव्य स्वर्गीय तात्यासाहेब रमेश सहादु पाटील पितृ स्मृती प्रवेशद्वार बांधून राज्यस्तरीय शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांच्या मान्यवरांची उपस्थिती त्याचे वडिलांच्या उत्तर कार्याच्या दिवशी लोकार्पण केले असून संपूर्ण समाज व्यवस्थेसमोर प्रेरणादायी व स्तुत्य आदर्श उभारला आहे.
शिक्षण व अध्यात्म क्षेत्राच्या संदर्भात आपल्या कुटुंबीयांची कृतीयुक्त पारंपरिक बांधिलकी किशोर पाटील कुंझरकर यांनी अधोरेखित केली आहे तसेच कुंझर गावाचे नाव सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या उंचीवर नेले आहे असे प्रतिपादन कुंझर गावचे माजी सरपंच मगन दादा बैरागी, रमेश आण्णा पवार, ईश्वर पाटील, आदींनी केले.महाराष्ट्र राज्य शिक्षण आदर्श शिक्षक पुरस्कार फक्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी सर्व गाव एकत्रित यावे व गावाच्या संदर्भात विविध योजना तसेच सकारात्मक घडावे यासाठी कुंझर विकास मंच ची स्थापना केली असून पक्षविरहित जात-पात विरहित संपूर्ण गावाचे सारीच मंडळी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असते हे विशेष.माझा गाव माझा स्वाभिमान असून माझ्या गावातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी आदरणीय व पितृतुल्य असून गावातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे व शिकून गावाचे नाव मोठे केले पाहिजे व माझ्या गावात सर्व लोकप्रतिनिधी मान्यवरांनी एकत्र येऊन समन्वयाने सर्व शासकीय योजनांचा जागर झाला पाहिजे गावाचा राळेगण सिद्धी सारखा विकास झाला पाहिजे असे आदर्श शिक्षक किशोर पाटिल कुंझरकर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.