Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मंत्रालयातील ‘हे’ केंद्र सुरू, नागरिकांना होणार ‘असा’ फायदा…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/05/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

राज्यातील शासकीय कारभार जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले आहे.

राज्यभरातील सामान्य नागरिक त्यांची निवेदने व टपाल घेऊन मंत्रालयात येत असतात, तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांद्वारे टपाल प्राप्त होत असते. याचे जलद गतीने वितरण होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडे ते टपाल पोहोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले आहे.

मध्यवर्ती टपाल केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे.

यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ई-खाते एनआयसी (NIC) मार्फत तयार करण्यात आले आहे. याद्वारे संबंधित विभागाकडे पाठविलेल्या टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार असून, त्या टपालाचा पुढील प्रवासही वेळोवेळी कळू शकणार आहे.

यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच, एकाच ठिकाणी सर्व विभागाचे टपाल स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे. नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाकडून ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच कार्यवाही होणार आहे.

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल याठिकाणी समक्ष स्वीकारले जाणार आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

पतसंस्था मध्ये ठेवी ठेवणाऱ्यांनो ‘ही ‘बातमी जरूर वाचा!

Next Post

शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर लोककलावंत विनोद ढगे यांची नियुक्ती

Next Post
शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर लोककलावंत विनोद ढगे यांची नियुक्ती

शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर लोककलावंत विनोद ढगे यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo