<
आज अनेक कामांसाठी आधार कार्ड आवश्यक झाले आहे. त्यामुळे बँक खाते उघडण्यापासून ते नवीन सिमकार्ड मिळवण्यापर्यंतची प्रक्रीया सोपी झाली आहे. आता सरकारने आधार प्रमाणीकरणाचा विस्तार केला आहे.वित्त मंत्रालयाने आता 22 वित्त कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांची आधारची पडताळणी करण्यास मान्यता दिली आहे.
यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी अधिसूचना जारी केली. वित्त मंत्रालयाने ज्या 22 कंपन्यांना आधार पडताळणीसाठी मान्यता दिली आहे त्यात टाटा, महिंद्रा, अॅमेझॉन आणि हिरो सारख्या वित्तीय कंपन्यांचा समावेश आहे.मंत्रालयाचे म्हणणे आहे की या 22 कंपन्या आता आधार क्रमांक वापरून ग्राहकांना ओळखू शकतील तसेच त्यांच्या इतर सर्व महत्त्वाच्या माहितीची पडताळणी करू शकतील.या 22 वित्त कंपन्यांमध्ये गोदरेज फायनान्स, अॅमेझॉन पे (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स, टाटा मोटर्स फायनान्स सोल्युशन्स, IIFL फायनान्स आणि महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, युनिऑरबिट पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड आणि एसव्ही क्रेडिटलाइन या कंपन्यांचा समावेश आहे.
आधार पडताळणीसाठी वित्त मंत्रालयाने परवानगी दिलेल्या कंपन्यांची यादी:- गोदरेज फायनान्स लिमिटेडपॉल मर्चंट्स फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडस्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेडस्वतंत्र मायक्रो हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडटाटा मोटर्स फायनान्स सोल्युशन्स लिमिटेडUniorbit Payment Solutions Limitedशुभलक्ष्मी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडहिरो फिनकॉर्प लिमिटेडएसव्ही क्रेडिटलाइन लिमिटेडशाखा इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमहिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडलाइट मायक्रोफायनान्स प्रायव्हेट लिमिटेडबेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेडIIFL फायनान्स लिमिटेडहिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडजेएमजे फिनटेक लिमिटेडमिडलँड मायक्रोफिन लिमिटेडरिव्हिएरा इन्व्हेस्टर्स प्रायव्हेट लिमिटेडसेव्ह मायक्रोफायनान्स प्रायव्हेट लिमिटेडशेअर इंडिया फिनकॅप प्रायव्हेट लिमिटेडऍमेझॉन पे (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडआदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड