<
जळगाव(प्रतिनीधी)- संजीवनी फाउंडेशन अंतर्गतआयोजित परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या सातव्या दिवशी प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्या “चौऱ्यात्तर पावसाळ्याचा जमाखर्च” या कथेचं अभिवाचन मुंबई येथील गिरीश पतके यांनी सादर केले. एका लेखकाने लेखकाच्या जीवनाविषयी लेखन करून मानवी जीवनाचे विविध पदर उलगडणारे हे अभिवाचन होते.वृद्ध माणसांच्या जगण्यात येणारी असहायता आणि मरणाची वाट पाहत असताना आयुष्याच्या उतारवयात आठवणी दाटून येतात, या आठवणीची ही कथा होती. पत्नीच्या निधनानंतर एकाकी माणसाच्या जीवनातील घटना, हिंसा, प्रेम अशा अनेक घटना गिरीश पतके यांनी सुंदर उभे केलेत. शहरीकरण, पोलिसदल, मुंबईतल्या गर्दीने निर्माण झालेले प्रश्न व यासाठी मी काहीच करू शकलो नाही अशी एकाकी व सामान्य माणसाची हतबलता व्यक्त करणारी ही इच्छामरण मागताना होणारी घुसमट मांडली. अतिशय मार्मिक , अंतर्मुख करणारे सामान्य जीवन अभिवाचन महोत्सवात सादर करण्यात आले. साहित्य अभिवाचन महोत्सवाला इंजिनियर असोसिएशन, आर्यन पार्क व आमदार राजू मामा भोळे यांचे सहकार्य लाभले आहे. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या अभिवाचनाची प्रकाश योजना रवी मिश्रा, पार्श्व संगीत प्रफुल्ल गायकवाड यांचे होते. याप्रसंगी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी डी एस बॊबडे, केशव स्मृतीचे रत्नाकर पाटील, डॉ. श्रध्दा महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केलं. उद्या शनिवारी महोत्सवाचा समारोप सायं ६.३० वा. “अमृता, साहिर आणि इमरोज”