Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवीन जिल्हा निर्मिती करताना नागरिकांच्या सोयीसाठी सरकार देणार ‘हा’ पर्याय…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/05/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई:- राज्यात गेले काही दिवसांपासून मोठ्या लोकसंख्येच्या आणि भौगोलिक आकारमानाच्या जिल्ह्यांचे विभाजन करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

काही जिल्हे हे भौगोलिक दृष्ट्या खूपच मोठे असल्याने जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी सर्वसामान्य माणसांना खूपच त्रास होतो. तो त्रास कमी करावा म्हणून जिल्ह्यांचे विभाजन येणार असल्याची चर्चा शासकीय स्तरावर सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जिल्हा मुख्यालयात जाण्याचे अंतर कमी होणार आहे. तसेच त्यांना सर्व प्रकारची प्रमाणपत्र आणि आपल्या शेतीविषयक इतर कामांसंदर्भातील माहिती आणि कागदपत्रे त्वरित जवळच्या मुख्यालयात मिळतील, यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वीस वर्षांच्या काळात मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन होऊन काही नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

वीस वर्षात दहा जिल्ह्यांचे विभाजन:- गेल्या वीस वर्षात दहा जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार करण्यात आला, संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन करून जालना जिल्हा तयार करण्यात आला. धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून लातूर जिल्हा निर्माण करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा तयार करण्यात आला आहे. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर हा जिल्हा तयार करण्यात आला. अकोला जिल्ह्याच्या विभाजनानंतर वाशिम जिल्हा तयार झाला.

धुळे जिल्ह्याच्या विभाजनानंतर नंदुरबार जिल्हा तयार करण्यात आला. परभणी जिल्ह्याच्या विभाजनानंतर हिंगोली जिल्हा तयार करण्यात आला, तर विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हाची निर्मिती करण्यात आली. अलीकडेच ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर नवीन पालघर हा जिल्हा तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यांचा विकास:- आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चर्चा निघाली की, पुन्हा एकदा जिल्हा निर्मिती करायची जिल्ह्यामध्ये वाढ करायची आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला माझा एवढाच प्रश्न आहे की, गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यात आपले सरकार आहे. नऊ महिन्यांमध्ये विकासाचे प्रश्न सोडवण्याऐवजी नवीन जिल्हा निर्मिती करून आपण काय साध्य करणार आहात? मराठवाडा आणि विदर्भामधील जिल्ह्यांचे विभाजन आणि निर्मिती करूनही काहीही साध्य झाले नाही.

कोकणामध्ये हरित सौंदर्य लयाला जाईल, असे उद्योग आपण आणत आहात. अशा शब्दांत कॉंग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी टीका केली आहे. विकासाचे कोणतेही काम न करता केवळ विकासाचा पैसा नको तिकडे खर्च करायचा आणि जिल्हा निर्मिती करायची, एवढेच काम या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे. नवीन जिल्ह्यांची निर्मिती न करता आहे त्या जिल्ह्यामध्ये कसा विकास करता येईल, यासाठी शासनाने काम केले पाहिजे असेही कुलकर्णी म्हणाले.

तीन अप्पर तहसील कार्यालय मंजूर:- दरम्यान राज्यात 12 तालुक्यांमध्ये अप्पर तहसील कार्यालयाबाबत प्रस्ताव आहे. सध्या तीन अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आली आहेत. लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी, रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर या अप्पर तहसील कार्यालयांना मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी पद निर्मिती करण्यात येत आहे.

सध्या तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची पदे मंजूर करण्यात आली आहे. इतर पदे जिल्हा अथवा तालुका महसूल कार्यालयातून वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती ही महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सामंजस्य कराराच्या माध्यमातून १२ हजार ८०० जणांना नोकरीची संधी; कौशल्य विकास विभागाची माहिती

Next Post

लंडनमधून जगदंबा तलवार परत येणार; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती

Next Post
लंडनमधून जगदंबा तलवार परत येणार; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती

लंडनमधून जगदंबा तलवार परत येणार; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d