<
अभियान कालावधीत विविध उपक्रम राबविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन
जळगाव दि. 23(प्रतिनिधी): 28 मे जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त जिल्हा परिषदे तर्फे आम्ही काटीबद्ध आहोत हे अभियान राबविले जाणार असून या दिनाचे औचित्य साधून दि.22 मे 2023 ते दि.28 मे 2023 या कालावधीत जिल्ह्यात रॅली,चर्चासत्रे,समारंभ,प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके,प्रसारमाध्यमातून लेखन साहित्याचा प्रसार,समजमाध्यमांचा योग्य वापर,स्पर्धा,पत्रलेखन,आदी मासिक पाळीं व्यवस्थापन संबंधी विविध तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमां चे या सप्ताहात आयोजन करण्यात येणार आहे.
मासिक पाळीं ही नैसर्गिक प्रक्रिया असूनही त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी परंपरामुळे मुली महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरीक त्रासाला सामोरे जावे लागते.स्वच्छ भारत मिशन(ग्रा) टप्पा-2 चा मासिक पाळीं व्यवस्थापन हा एक महत्वाचा घटक आहे.या पाश्र्वभूमीवर या दिनाचे औचीत्य साधून व्यापक प्रमाणावर अभियान कालावधी दरम्यान जनजागृती करण्यात येणार आहे.महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीं दरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबीना केंद्रस्थानी ठेवून जनजागृती सप्ताह तालुका व ग्रामपंचायत स्थरावर आयोजीत करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.