<
ताजमहालची निर्मिती करण्यासाठी एकूण 22 वर्ष लागले आहेत. ताजमहालच्या निर्मितीसाठी जवळजवळ 22 हजार मजुरांचे योगदान आहे. ताजमहाल बांधण्याची सुरुवात 1632 मध्ये होऊन त्याचे काम 1654 मध्ये पूर्ण झाले.
ताजमहाल हा लाकडांच्या आधारावर उभा आहे. हि लाकडे टिकण्यासाठी आर्दतेची गरज भासते कि जी यमुना नदीच्या पाण्यातून मिळते.ताजमहाल हे जगातील सर्वाधिक जास्त भेटी दिले जाणारे स्थळ आहे.
ताजमहाल बघण्यासाठी जगभरातून दररोज जवळजवळ 12 हजार पर्यटक येत असतात.ताजमहालच्या शेजारी 41.6 मीटर उंचीचे एकूण 4 मिनार आहेत. ते बाहेरच्या बाजूस थोडेसे झुकलेले आहे. ताजमहालची निर्मिती करण्यासाठी त्यावेळी एकूण 3.2 कोटी रुपये खर्च आला होता. जर ताजमहालची निर्मिती आताच्या काळात केली असती तर त्यासाठी जवळपास 7000 कोटी रुपये खर्च आला असता.
ताजमहालचा रंग वेगवेगळ्या वेळी बदलत असतो. सकाळी पाहिल्यावर तो गुलाबी रंगाचा दिसतो. रात्री पाहिल्यावर तो पांढऱ्या रंगाचा दिसतो तर चांदण्या रात्री तो सोन्यासारखा दिसतो.ताजमहालचे सर्व कारंजे एकाचवेळी कार्यरत होतात. त्या सर्व कारंजाच्या खाली तांब्याच्या टाक्या आहेत. त्या सर्व टाक्या एकाचवेळी भरतात व त्यावर दाब आल्यावर त्या एकत्रच पाणी सोडतात.