<
राज्यातील अनेक उमेदवारांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्याबाहेरील केंद्रांवर जावे लागणार आहे. परिणामी, आता उमेदवारांच्या वर्तुळातून राज्यातील केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
या परीक्षेसाठी संपूर्ण अर्ज आणि शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना राज्यात केंद्र देण्यात येणार आहे.केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सीटीईटी राज्यातील अनेक उमेदवारांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत, ही परीक्षा साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे.
या परीक्षेसाठी अनेक ग्रामीण भागतील उमेदवार इच्छुक असल्याने या उमेदवारांना आता परीक्षेसाठी राज्याबाहेर जावे लागणार आहे, याविषयी उमेदवारांना अर्ज भरताना कल्पना देण्यात आली होती.राज्यात नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवरील परीक्षार्थी क्षमता संपल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २६ मेपर्यंत होती. राज्यातून या परीक्षेसाठी ग्रामीण भागातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत.