<
जळगाव-(प्रतिनिधी) – पाळधी येथे आज दि. 21 जून रोजी इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमधे “आंतरराष्ट्रीय योगा” दिन उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रित्या सूर्यनमस्काराचे सादरीकरण केले.
शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी शाळेचे चेअरमन इंजिनिअर श्री. नरेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले कि शिक्षकांनी अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियेत योगसाधना कशी महत्त्वाची आहे. तसेच प्राचार्य परवीन खान, समन्वयक जी.डी. पाटील सर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने शिकवलेले योग पूर्ण केले. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देऊन सतत योगा करण्यात प्रोत्साहन दिले. अशा प्रकारे इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.