<
बहरलेला निसर्ग या काव्य संग्राहाचे, मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
लोहारा ता.पाचोरा जी.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
एक दिवशीय कवी संमेलनाचे आयोजन सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले. कै.रामभाऊ पा. कल्याणकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेंच्या वतीने गुणवंत विध्यार्थांच्या सन्मान सोहळ्याचे देखील आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप-प्रज्वलन व राष्ट्रसंत गाडगे बांबांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलिस निरिक्षक दामिनी पथक औरंगाबाद ग्रामीण , आरती जाधव या होत्या.
यात मंगलदास मोरे लिखित *बहरलेला निसर्ग* या काव्य संग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
कु.आकांक्षा कल्पेश पंडीत हिच्या प्रथम वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या कवी तथा मान्यवरांचा सु-लक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून
सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच कै.रामभाऊ पां. कल्याणकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेंचे भरत आर कल्याणकर,आकाश कल्याणकर यांच्या वतीने दहावी,बारावी,उतीर्ण गुणवंताचां देखील प्रशस्तीपत्र ,सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देवुन सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी, सुमित संजय सोनवणे,सार्थक सुभाष दाभाडे,पूर्वा प्रवीण दिवेकर,व इतर विध्यार्थांचा
सत्कार करण्यात आला,
या कार्यक्रमास उपस्थित वर्षा व्हगाडे स.नो.पी यांनी माणुसकी या विषयांवर प्रकाश टाकला व आपल्या लिखित कवितेतून खरा पांडुरंग कोन्ही पाहिला याचे प्रत्यक्ष उदःहरण देतांना समाजसेवा सर्वांनाच कळते पण वळत नाही, ज्यांना प्रत्यक्षात कळतेही अन वळतेही त्यातील एक नाव म्हणजे सुमित पंडीत, त्यांनी आपल्या कवितेतून उपस्थितांना करुन दिली. व आला बाबूराव फेम सुरेशजी कांबळे,प्रा.विष्णू सुरासे (हास्य कवी), कवी प्रा. बालाजी कांबळे, कवी एम एम खुटे, कवी मंगलदास मोरे, कवी शिल्पा साळवे,उज्वला बागुल,कवी कमलाकर माळी,खान शमीम शायर,जीवनसींग राजपूत यांनी आपल्या कवीता सादर केल्या,तसेच ज्युनिअर चार्ली फाँडेशन चे अध्यक्ष सोमनाथ स्वभावणे यांनी चार्ली च्या वेशभूषेत उपस्थित नागरीकांना मंत्रमुग्ध केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीतेंद्र कासलीवाल,प्रा.शरद सोनवणे, सय्यद साबेर,सुमित पंडित,उमाकांत वैद्य,चेतन पाटील,ज्ञानेश्वर पंडित,पुजा पंडित,डॉ तेजस्वी तुपसागर,सुनीता ढवळे,धनश्री पंडित,जोती पंडित,तसेच माणुसकी समुहातील सर्व सभासदांनी मदतकार्य केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.बालाजी कांबळे यांनी केले.