<
लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धी शेंदुर्णी सेकं एज्यु को-ऑप सोसा द्वारासंचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा ता पाचोरा विद्यालयात दि 17 जुलै 2023 रोजी संस्थेचा 79 वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक भीमराव शामराव शेळके होते त्यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवर मंडळी यांच्या हस्ते सरस्वती माता हरिप्रसाद महाराज कै आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड कै अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आर एस परदेशी यांनी केले.
त्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या पायाभरणी पासून इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला तसेच शाळेतील सर्व उपक्रमां बद्दल माहिती सांगितली मान्यवर प्रमुख पाहुण्यांमध्ये कृषी भूषण विश्वासराव शेळके स्थानिक सल्लागार समिती सदस्य अ अ पटेल डिगंबर चौधरी उत्तमराव शेळके शिवराम भडके संजय पांडुरंग पाटील ज्ञानेश्वर माळी प्रताप चौधरी संजय कल्याणकर श्रीराम जगताप प्रताप सुर्वे लक्ष्मण बावस्कर योगेश चौधरी ललित जैन लक्ष्मण सोनवणे सुरेश माळी विश्वनाथ बोरसे लिंगायत सर म्हसास येथील प्रकाश पाटील रामेश्वर तांडा येथील सरपंच दत्तू भाऊ राठोड दीपक राठोड लोहारा येथील माजी सरपंच डॉ बाळू जैन ज्येष्ठ पत्रकार महेंद्र शेळके ज्ञानेश्वर राजपूत अडव्होकेट नाना महाजन सामाजिक कार्यकर्ते अण्णा बेलदार डॉ देवेंद्र शेळके डॉ महेंद्र गीते डॉ प्रीतेश चौधरी सोसायटी चेअरमन सुनील क्षीरसागर श्रीराम मंदिर अध्यक्ष श्रीराम कलाल नंदू सुर्वे माजी सरपंच दत्तू माळी उपस्थित होते विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस टी चिंचोले पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके सर्व सर्व शिक्षक शिक्षकेतर व वस्तीगृह कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन 2022 -23 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम द्वितीय व तृतीय व विशेष प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवर मंडळी यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथमेश पुरुषोत्तम सुर्वे व वृषभ प्रदीप क्षीरसागर या यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचेही स्वागत करण्यात आले वस्तीगृहातील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले दर वर्षाप्रमाणे आबासाहेब शेळके यांच्या निधीतून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावर्षी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी व शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी गावातील दानशूर व्यक्तींकडून गणवेश वह्या व शैक्षणिक साहित्य घेण्यात आले यामध्ये गावातील राहुल कटारिया यांनी सतरा गणवेश डॉ प्रितेश चौधरी यांनी पाच गणवेश डॉ महेंद्र गीते यांनी पाच गणवेश प्रताप चौधरी संजय कल्याणकर प्रत्येकी दोन गणवेश विद्यालयातील शिक्षकांनी अकरा गणवेश गावातील विवेक जाधव यांनी वस्तीगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याला चार वह्या याप्रमाणे 120 वह्यांचे वाटप केले तर बाजीराव नामदेव माळी एक हजार अनंत क्षीरसागर 500 कैलास चौधरी सहाशे शिवाजी चौधरी कळमसरा 300 शरद देशमुख 500 या नागरिकांनी गणवेशासाठी पैसे दिलेत शिवाय तुकाराम भाऊ पतपेढी 10 गणवेश राणी लक्ष्मीबाई पतपेढी शेंदुर्णी 10 गणवेश एकनाथ भोसांडे लोहारा पाच गणवेश नाना महाजन वकील एक ड्रेस याप्रमाणे जवळजवळ 60 ते 65 गणवेश वाटप करण्यात आले संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय परिसरात वृक्षारोपण ही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शिक्षकांमधून आर के सुरवाडे यांनी संस्थेच्या कार्याविषयीची माहिती दिली पि यू खरे सर व व्ही बी इंगळे यांनी संस्थेवर व बापूसाहेबांवर एक गीत सादर केले मान्यवरांमधून अ अ पटेल शिवराम भडके विश्वासराव शेळके यांनी आपले मनोगत सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके यांनी संस्थेच्या कार्याविषयी व बापूसाहेबांच्या जीवनाविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एम शिरपुरे यांनी केले व आभार वाय पी वानखेडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वस्तिगृह बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.