<
जळगांव(प्रतिनीधी)- दि.२८ रोजी उज्ज्वल्स मध्ये विज्ञान प्रदर्शन२०१९ हे उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी हे प्रदर्शन घेण्यात येते ज्यामध्ये विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी भरलेल्या प्रयोगाचे सादरीकरण करतात. MIT पुणे या शैक्षणिक संकुलाच्या कार्यकारी विश्वस्त आणि जळगांवचे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या पत्नी सौ ज्योती ढाकणे या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. अत्यंत नाविन्यपूर्ण चार मशालींचे प्रज्वलन करण्यात येऊन आकाशात पर्यावरण पुरक संदेशा सहीत फुगे सोडण्यात आले. तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागरुकतेवर नृत्य सादर केले. अशा रीतीने दीपप्रज्वलन करुन सौ ज्योती ढाकणे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन२०१९ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टींचा अभ्यास करावा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा ध्यास घ्यावा. बोर्डापेक्षा शिकवण्याची पद्धत काय आहे हे महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांनी व पालकांनी कायम लक्षात घ्यावे. तसेच मातृभाषेवर प्रेम करावे त्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले यासाठी त्यांनी आपल्या जवळपासचे डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम या आदरणीय व विद्वान व्यक्तींची उदाहरणे देऊन आपला मुद्दा सोदाहरण सांगितला. भविष्यात आपल्या शहराचा व खेड्या गावांचा विकास करावा आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रदर्शनात बालवाडी ते दहावीच्या च्या विद्यार्थांनी आँरेंज, ग्रीन, व्हाइट व ब्लू अशा चार हाऊस(गट) मध्ये सहभाग घेतला. त्यात पवनचक्की, वायू व जल प्रदुषण, विज बचत, पर्यावरण रक्षण व संवर्धन, ज्वालामुखी, सौर ऊर्जा, ठिबक सिंचन पावसाच्या पाण्याने जमिनीत पुर्नभरण आदी विषयांवर प्रात्यक्षिक सादर केले. सदर स्पर्धेत ग्रीन हाऊस(गट) यांचे प्रदर्शन सर्वोत्कृष्ट ठरले तर नर्सरीतून तेजस म्हस्के प्रथम व ज्यू. बालवाडीतून पाखी हेमनानी व सिनिअर बालवाडीतून स्वरा पुरोहीत आले तसेच इ. १ली ग्रिन हाऊस, २री पांढरा हाऊस, ३री पांढरा हाऊस, ४थी ब्लू हाऊस, ५वी ब्लू हाऊस, ६वी ग्रीन हाऊस, ७वी आँरेंज हाऊस, ८वी व्हाइट हाऊस, ९वी ब्लू हाऊस, तसेच १०वी ब्लू हाऊसचे सर्वाकृष्ट ठरले. या विज्ञान प्रदर्शन२०१९ मध्ये प्रा. अविनाश बागुल, प्रा. हर्षल राणे, भाग्यश्री तळेले यांनी परीक्षक म्हणून सहकार्य केले. यावेळी उज्ज्वल्स स्पाउटर इंटरनॅशनल च्या संस्थापक अध्यक्षा अनघा गगडाणी, विश्वस्थ प्रवीण गगडाणी, मुख्याध्यापिका मानसी भदादे उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.