Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालहत्याचा न्याय पाहिजे;बालिकेच्या आईसह ग्रामस्थाचा पोलिस स्टेशन समोर आक्रोश करीत ठिय्या आंदोलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
बालहत्याचा न्याय पाहिजे;बालिकेच्या आईसह ग्रामस्थाचा पोलिस स्टेशन समोर आक्रोश करीत ठिय्या आंदोलन

भडगांव-( प्रतिनिधी) – तालुक्यातील गोंडगांव येथील ८ वर्षीय बालिकेचे अपहरण करुन संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याबाबत आज दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान गोंडगांव येथील बालिकेच्य आई सह महिला ग्रामस्थ यांनी भडगांव पोलिस स्टेशन समोर बालहत्याचा न्याय पाहिजे आरोपींना तात्काळ अटक करा या मागणी साठी गोंडगांव येथील बालिकेच्या आईसह ग्रामस्थांनी आक्रोश करीत ठिय्या आंदोलन केले.

याबाबत सविस्तर असे की गोंडगाव ता.भडगाव येथील कल्याणी संजय पाटील हि आठ वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची घटना दि.३० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान घडली होती याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीसा मार्फत तिचा शोध घेण्यात आला या बालिकेचा तपास सुरू असतानाच सदर बालिका दि.१ ऑगस्ट रोजी गावातील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात मृत अवस्थेत मिळुन आली.


या घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल करा व सशंयित आरोपींचा शोध घेवुन आरोपींना तात्काळ अटक करा, बालहत्याचा न्याय द्या, या मागणी साठी गोंडगांव येथील बालिकेच्या आईसह २५० ते ३०० ग्रामस्थांनी आक्रोश करीत ठिय्या आंदोलन केले.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे,सहाय्यक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि.किसनराव नजन पाटील, पाचोरा पो.नि.राहुल खताळ, चाळीसगांव वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तुषार देवरे, भडगांव पोलिस निरिक्षक राजेंद्र पाटील,सहाय्यक पोलिस निरिक्षक चंद्रसेन पालकर,पोलिस उपनिरिक्षक शेखर डोमाळे भडगांव पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या सह चाळीसगांव उपविभागातले ३ अधिकाऱ्यां सह २५ कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला

प्रतिक्रिया

अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांनी तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक त्या सर्व गोष्टी आम्ही करीत आहोत निष्पाप लोंकाना अटक केल्या पेक्षा जो खरा आरोपी आहे त्यांना आम्ही अटक करु,चौकशी आमची चालु आहे.या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डोळे आले आहेत का? मग अशी घ्या काळजी-डॉ. जयेश वाल्हे

Next Post

अखेर ऋषीबाबा -लोहारा रस्ता शेतकऱ्यांनी केला लोक वर्गणीतुन तयार!!

Next Post

अखेर ऋषीबाबा -लोहारा रस्ता शेतकऱ्यांनी केला लोक वर्गणीतुन तयार!!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d