<
जळगांव – (प्रतिनिधी) – येथे दिनांक 05 ऑगस्त 2023 रोजी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे सहनिबंधक मुद्रांक जिल्हाधिकारी श्री सुनील पाटील यांचे महसूल सप्ताह निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यात महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी 01 ऑगस्ट हा दिवस राज्यात महसूल दि म्हणून साजरा करण्यात येतो. जनतेला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाचे औचित्य साधून सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नोंदणी व मुद्रांक विभाग जळगाव यांच्या वतीने समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ.शाम सोनवणे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्तावितेतून महसूल दिनाचे व महसूल सप्ताहाच्या आयोजन करण्यात मागचा उद्देश स्पष्ट केला. श्री सुनील पाटील यांनी आपल्या विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती करुन देताना सांगितले की, विवाह नोंदणीची आवश्यकता आणि महत्त्व विशद केले. मुद्रांक शुल्क माफी योजना, सलोखा योजना अशा विविध योजनांची विद्यार्थ्यांना व उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी हे उपस्थित होते. आपल्या मनोगतातून सांगितले की, शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी योग्य समन्वय साधून खऱ्या अर्थाने शासनाच्या योजना राबविण्यासाठी मध्यस्थी करू शकतो. त्यामुळे आजचे व्याख्यान त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रा डॉ शाम सोनवणे, प्रा डॉ. यशवंत महाजन, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, प्रमुख वक्ते मुद्रांक अधिकारी श्री सुनील पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शाम सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. योगेश महाजन, प्रा. डॉ. कल्पना भारंबे, प्रा. डॉ. भारती गायकवाड प्रा. डॉ. अशोक हनवते प्रा. डॉ. दीपक महाजन प्रा. डॉ. प्रशांत भोसले प्रा. डॉ. जुगल घुगे प्रा. डॉ. भुषण राजपूत व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.