Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

२६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
२६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक

वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेत कारवाई

११९ कोटींची बनावट बिले विक्री प्रकरण

जळगाव,दि.४ ऑगस्ट (जिमाका)- वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने विशेष मोहीमे अंतर्गत ११९ कोटींची खोटी देयके सादर करून २६ कोटींची करचोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाच्या जळगाव विभागाचे राज्यकर सह आयुक्त सुभाष भवर यांनी दिली आहे.

बनावट बिलांच्या विक्रीमध्ये सहभागी असलेल्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून जळगाव येथील मे.अग्रवाल असोसिएटसची चौकशी करण्यात आली. यामध्ये मे.अग्रवाल असोसिएटसचे मालक नैनेश संतोष अग्रवाल यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केला.

या प्रकरणात नैनेश अग्रवाल याला अटक होऊन १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने पुन्हा एकदा करचोरी करणाऱ्यांना आणि बनावट पावत्या जारी करणाऱ्या आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा आणि पासिंग करणाऱ्या व्यक्तींना कठोर इशारा दिला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे अपर राज्यकर आयुक्त सुभाष एंगडे, जळगाव विभागाचे राज्यकर सहआयुक्त सुभाष परशुराम भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्वेषण शाखेचे राज्य कर उपायुक्त महेंद्र शिंदे, सहायक राज्यकर आयुक्त माहूल संजयकुमार इंदानी, यांच्या नेतृत्वाखाली रविंद्र पोटे सहायक राज्यकर आयुक्त, राज्यकर निरीक्षक व कर सहाय्यक यांनी ही कारवाई अंमलात आणली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गोंडगांव येथील ८ वर्षीय बालिके वरील अत्याचाराच्या निषेधार्थ भडगांव तहसिल कार्यालयावर काढला मुक मोर्चा.!!!

Next Post

महसूल सप्ताह निमित्त सहनिबंधक सुनील पाटील यांचे व्याख्यान संपन्न

Next Post
महसूल सप्ताह निमित्त सहनिबंधक सुनील पाटील यांचे व्याख्यान संपन्न

महसूल सप्ताह निमित्त सहनिबंधक सुनील पाटील यांचे व्याख्यान संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo