<
जळगांव(प्रतिनीधी)- शहरात जागतिक शाकाहार दिनानिमित्त श्री जैन युवा फाउंडेशन, जळगांव तर्फे मंगळवार १आँक्टोबर रोजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित शाकाहार रॅली काढण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती ३० रोजी पत्रकार परिषदेत शाकाहार प्रणेते रतनलालजी बाफना यांनी दिली. प्रत्येकाने शुद्ध व सकस आहार घ्यावा. दीर्घायुष्यासाठी शाकाहार महत्वपूर्ण ठरतो. मांसाहार जितके शरीराला घातक आहे त्याहून अधिक घातक पर्यावरणाच्या दृष्टीने आहे. यासाठी प्रचार-प्रसार रॅली करण्यात येणार आहे. त्याबाबतचे संदेश देणारे फलक रॅलीत असतील. श्री जैन युवा फाउंडेशनचे रॅली काढण्याचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी शाकाहार या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच झांकी(ट्रॅक्टर वरील देखावा) स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या रँलीची सकाळी ७.४५ वाजता शिवतिर्थ मैदानापासून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात होईल व त्या रँलीचा समारोप महात्मा गांधी उद्यान येथे होईल. त्यानंतर उद्यानात सभा घेतली जाणार आहे. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, तुषार चोथानी हे मार्गदर्शन करतील. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त उदय टेकाळे, पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, माजी खासदार ईश्वरलाल जैन, संघपती दलीचंद जैन, उद्योजक अशोक जैन, गोसेवक अजय ललवाणी उपस्थित राहणार आहेत. रॅलीत २५ शाळांचे विद्यार्थी, शाकाहार प्रेमी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभाग घेणार आहेत. नागरिकांनी सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत श्री जैन युवा फाउंडेशन चे अध्यक्ष दर्शन टाटीया, सचिव रितेश छोरीया, कोषाध्यक्ष पियुष संघवी, सदस्य प्रविण छाजेड, प्रविण पगारिया, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, चंद्रशेखर राका, राहुल बांठीया, अल्पेश कोठारी, प्रणव मेहता, पारस कुचेरिया, विनय गांधी आदी उपस्थित होते.