<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथे राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रम अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका जळगाव व तुळजाई बहुउद्देशीय संस्था मेहरून यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रोजी आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिवस पथनाट्य व जनजागृतीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
यात तुळजाई बहुउद्देशीय संस्था मेहरून यांचे संस्थापक अध्यक्ष श्री भूषण लाडवंजारी यांच्यामार्फत मेहरून परिसरातील श्रीराम विद्यालय व यादे पाटील विद्यालय येथे कलावंत शैलेश दुबे नेहा पवार बुद्धभूषण मोरे निलेश लोहार लखन तिवारी व करण मानकर यांनी पथनाट्य सादर केले.
या पथनाट्य त्यांनी जागतिक शुध्द हवा दिवसावर ही माहिती कलेतून हस्त खेळत दिली माणसांना जीवन जगण्याकरिता अन्न पाणी हवा या तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते, एखादी नॉर्मल व्यक्ती दिवसाला दोन ते चार किलो अन्न खातो, आठ ते दहा लिटर पाणी पितो आणि हवा ?
एखादी नॉर्मल व्यक्ती एका दिवसाला जवळपास 12000 लिटर हवा शरीरात घेत असतो.
आपण अन्न खाताना धुवून पुसून उकळवून स्वच्छ करून मग खातो, पाणी देखील पिताना ते गाळून उकळून स्वच्छ असेल तरच पितो, मग जर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात हवा श्वासाद्वारे शरीरात घेत असून तर ती हवा स्वच्छ, शुद्ध नको का?
हवा शुद्ध ठेवण्याकरता झाडांचे महत्त्व काय ?
आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की सजीवांना जिवंत राहण्याकरता अन्नाची आवश्यकता असते. झाड देखील सजीव असल्यामुळे झाडालाही अन्नाची गरज असतेच. झाडे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.
झाडांच्या अन्य तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असे म्हणतो. या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये झाड वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड आणि जमिनीतील पाणी या दोघांचा वापर करून ग्लुकोज ची निर्मिती करतात आणि बायप्रॉडक्ट म्हणून तयार झालेला ऑक्सिजन हा बाहेर सोडला जातो.
आणि याच ऑक्सिजनचे आपल्याला जगण्यासाठी आवश्यकता असते.
सदर उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध हवेचे महत्व सांगण्यात आलेले असून दैनंदिन वापरात कशाप्रकारे हवेचे प्रदूषण आटोक्यात आणता येईल याबद्दल पथनाट्याद्वारे माहिती देण्यात आली.
हे कार्यक्रम जळगाव महापलिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात महापालिकेचे अधिकारी योगेश वाणी यांनी मार्गदर्शन केले.
तसेच श्रीराम विद्यालयचे सरस्वती पाटील, प्रतिभा पाटील, अतुल चाटे,भगवान लाडवंजारी व या दे पाटील विद्यालयात मुख्यधपक खंबायक सर,वाणी सर,वाघ सर, सानप सर, लिंगायक सर, अहिराव मॅम, आदीचे मदत लाभली.