Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात ‘विशाखा’ समितीतर्फे चर्चासत्र संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2023
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात ‘विशाखा’ समितीतर्फे चर्चासत्र संपन्न

फैजपूर-(प्रतिनिधी) – येथील तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संचलित धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर येथे दिनांक 01/09/2023 रोजी ‘विशाखा’ समिती अंतर्गत ‌ ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या संदर्भात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे हे होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ.सौ.एकता सरोदे उपस्थित होत्या. वक्त्यांनी चर्चासत्रात वाढत्या वयाबरोबर मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात, या बदलांची जाणीव प्रत्येक मुलींना असायला हवी, मासिक पाळीमुळे स्त्रियांचे आरोग्य चांगले राहते ,त्यासाठी मुलींनी मासिक पाळीचा कोणताही बाऊ करू नये किंवा घाबरून जाऊ नये. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी या काळात प्रत्येक मुलींनी आपल्या शरीराची योग्य काळजी घ्यावी,नियमित योगा आणि प्राणायाम करावा.

आहारात पालेभाज्यांचा वापर करावा, दुग्धयुक्त व प्रोटीन युक्त पदार्थ खावेत. तसेच आजच्या काळात स्त्रियांमध्ये अनेक आजार बळावत आहेत. त्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी समतोल आहार करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे सांगितले, चर्चासत्रात मुलींनी विचारलेल्या वैयक्तिक समस्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच विविध प्रश्नांवर व समस्यांवर चर्चा करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘विशाखा’ समितीचे चेअरमन प्रा.तिलोतमा चौधरी यांनी, सूत्रसंचालन प्रा.अर्चना वराडे व आभार प्रा.जयश्री सरोदे यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.उत्पल चौधरी पर्यवेक्षक कनिष्ठ महाविद्यालय, प्रा.कविता भारुडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध – अतुल जैन

Next Post

राष्ट्रीय शुध्द हवा दिवसानिमित्त शहरात महापालिके मार्फत पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती

Next Post
राष्ट्रीय शुध्द हवा दिवसानिमित्त शहरात महापालिके मार्फत पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती

राष्ट्रीय शुध्द हवा दिवसानिमित्त शहरात महापालिके मार्फत पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d