जळगाव प्रतिनिधी – लोकशाहीचा आत्मा असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार व छेडछाड करून लोकशाही संपविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, याविरोधात जळगांव शहरात विविध संस्था,संघटन,लोकशाहीवादी नागरिकांनी लोकशाही बचाव संघर्ष समिती या अराजकीय संघटनेची स्थापना केली असून या समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक १४ जुलै २०१९ रोजी दुपारी ३ वाजता पद्मालय शासकीय विश्रामगृह, जयकीसनवाडी, जळगांव येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालसमोर लोकशाही बचाव संघर्ष समिती मंगळवार दिनांक १६ जुलै२०१९ रोजी ईव्हीएम हटाव या मागणीसाठी धरणे आंदोलन करणार असून त्याच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.तसेच जळगांव येथे राज्यस्तरीय ईव्हीएम विरोधी परिषदेच्या आयोजनाबाबत नियोजन केले जाणार असून शहरात हजारोंच्या संख्येने मोर्चा आयोजित करण्यासंदर्भात देखील विचारविनिमय होणार आहेत.याबैठकीत शहरातील लोकशाहीवादी नागरिक,संस्था,संघटना,पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे पदाधिकारी मुकुंद सपकाळे,भारत ससाणे, बाबुराव वाघ,हरिश्चंद्र सोनवणे, राजू मोरे,गमीर शेख,अमोल कोल्हे,गुरुनाथ सैंदाणे, अशपाक पिंजारी,दिलीप सपकाळे, अरविंद मानकरी,फहिम पटेल व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.