<
जळगाव – रेडक्रॉस रक्तकेंद्रात उपलब्ध असणारे जगातील सर्वात सुरक्षित नॅट टेस्टेड तंत्रज्ञान हे जिल्ह्यातील रुग्णांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. या तंत्रज्ञानाची माहिती प्रत्येक रुग्णांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असून सर्व डॉक्टरांनी ही रक्त व रक्तघटकाची मागणी करताना नॅट टेस्टेड रक्ताचीच मागणी लिहून द्यावी तसेच रेडक्रॉसमार्फत डॉक्टरांसाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण (CME) चर्चासत्राचे आयोजन करून याबाबत सर्व डॉक्टरांना माहिती द्यावी अशी विनंती आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा यांनी नॅट तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार चर्चासत्रात व्यक्त केली. या चर्चासत्रात जळगाव शहरातील इंडियन मेडिकल असोशिएशनचे पदाधिकारी, रोटरी, लायन्स, इनरव्हील, भारत विकास परिषद, सी.ए. असोशिएशन इत्यादी संस्थांचे अध्यक्ष- सचिव व प्रतिनिधी उपस्थित होते.
हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे यांनी जळगाव रेडक्रॉस रक्तकेंद्र हे महाराष्ट्रातील एक अद्ययावत रक्तकेंद्र असून रुग्णांना चांगली रुग्णसेवा देत आहे याविषयी समाधान व्यक्त करताना नॅट टेस्टेड रक्तघटकाचे सेवाशुल्क काही प्रमाणात कमी केल्यास सर्वच रुग्णांना याचा फायदा घेता येईल असे मनोगत व्यक्त केले. तसेच जे डॉक्टर्स नियमितपणे नॅट टेस्टेड रक्ताची मागणी पाठवितात त्यांना विशेष सन्मान करून प्रोत्साहित करावे असे मत व्यक्त केले.
आयएमएचे सचिव डॉ. तुषार बेंडाळे यांनी असे मत व्यक्त केले कि सर्व डॉक्टरांनी रुग्णांना नॅट टेस्टेड रक्तघटकाचे महत्व पटवून द्यावे आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना सेवाशुल्कात सवलत देण्याकरिता प्रशासनाने योजना तयार करावी. रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष श्री. मनोज जोशी यांनी काही कारणामुळे मी स्वतः रक्तदान करू शकत नाही पण मी आर्थिक योगदान देऊ शकतो. याविषयी त्यांनी एक योजना राबविण्या विषयी मार्गदर्शन केले. रोटरी संलग्न एक हजार परिवार सेवा देतात. त्यातील प्रत्येक परिवाराने जर आपापल्या परीने आर्थिक योगदान दिले तर प्रत्येक गरजू रुग्णाला कमी सेवाशुल्कात नॅट टेस्टेड रक्तघटक देणे शक्य होईल.
इनरव्हील क्लब न्यू जेनच्या सचिव फातेमा राजकोटवाला यांनी सांगितले कि अजून हि बऱ्याच नागरिकांना नॅट तंत्रज्ञानाबाबत माहिती नाही. तरी कन्सल्टनट डॉक्टर्सनी नॅट टेस्टेड तंत्रज्ञानाबाबत नागरिकांना देऊन महत्व पटवून द्यावे. सर्व सामान्य नागरिकांना याबाबत माहिती देण्यासाठी पोस्टर, बॅनर सोशल मिडियाचा वापर करावाअसे मत रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या अध्यक्ष सौ. सरिता खाचणे यांनी मांडले. भारत विकास परिषदेचे श्री. उमेश पाटील आणि श्री. सी ए असोशिएशनचे सचिव श्री. हितेश आगीवाल यांनी म्हटले कि सी ए असोशिएशन, भारत विकास परिषदेमार्फत त्यांच्यामार्फत आरोग्य योजनांमधून आर्थिक तसेच प्रचार प्रसार करण्यासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. हॉस्पिटल्समध्ये शासनाच्या विविध आरोग्य योजना मधून रुग्णांना नॅट टेस्टेड रक्तघटक देण्यासाठी नियम बनवावेत असे मत हि यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले कि, गेल्या पाच वर्षांपासून जळगाव रेडक्रॉस रक्तकेंद्रात जगातील सर्वात सुरक्षित नॅट टेस्टेड तंत्रज्ञान उपलब्ध झाले. परंतु या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे रक्त संक्रमणातून होणारे जीवघेन्या आजारांपासून रुग्णांना वाचविण्याकरिता कन्सल्टनट डॉक्टर्स व आरोग्य सेवेतील सक्रीय सामाजिक स्वयंसेवकांनी योगदान देणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाने तपासणी केलेले रक्त व रक्तघटक अनवधानाने रक्तसंक्रमणाने होणाऱ्या अनेक आजारांपासून वाचवू शकते. याची योग्य माहिती आपल्या सर्वांच्या सहकार्याने जास्तीत जास्त नागीरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान आवश्यक आहे असे आवाहन हि त्यांनी केले. रेडक्रॉसचे चेयरमन श्री. विनोद बियाणी यांनी रेडक्रॉस रक्तकेंद्र रुग्णांना देत असलेल्या सर्व सेवासुविधांची माहिती दिली. जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद यांचे समन्वयक श्री. दुशांत बम्बोडे यांनी मान्यवरांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.उज्वला वर्मा यांनी केले.
याप्रसंगी रेडक्रॉसचे कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, डॉ. अपर्णा मकासरे, घनश्याम महाजन, श्री. अनिल शिरसाळे सौ. शांताताई वाणी, तसेच कल्पेश शाह, श्री. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. भरत बोरोले, अजित महाजन, प्रकाश पटेल, सचिन जेठवाणी, संजय शाह, धनराज कासार, रितू कोगटा, माधवी असावा, सुरमित छाबडा, प्रसाद झंवर, शिरीष शिसोदिया, शीतल अग्रवाल, निलेश संघवी, योगेश सांखला, प्रतिक वाणी, महेश जडीये, मुनीर तरवारी, डॉ.दर्शना शाह, मनोज सैनी, डॉ. व्ही.एम.चौधरी, प्रसन्न मांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.