बांभोरी प्रचा येथील जी.प.शाळेत आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
बांभोरी प्रचा गावातील जिल्हा परिषद शाळेत महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नवीन गणवेश,बूट,व इतर शैक्षणिक साहित्य बांभोरी प्रचा चे युवा सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे व मुख्याध्यापिका सौ.माया अमोदकर मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले.
या मंगलप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री.जगदीश नन्नवरे,श्री.अमोल नन्नवरे,श्री.संदीप कोळी,श्री.हिरामण नन्नवरे तसेच शाळेतील शिक्षक श्री.रवींद्र सोनवणे,श्री.ज्ञानेश्वर सावळे श्री.अविनाश पाटील,श्री.मनोहर पाटील,श्रीमती.मनीषा पाटील,श्रीमती.उषा सूर्यवंशी,श्रीमती.सविता बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.