नाशिक-(प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी लढा देणारे व भ्रष्टाचार मुक्त राष्ट्राची स्वप्न पाहणाऱ्या कायदा प्रेमींसाठी राज्यस्तरीय संमेलन पाच नोव्हेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कायदा प्रेमी येणार असून संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे.
सदर संमेलनात मुंबई हून गाढे अभ्यासक कमलाकर शेनॉय यांचे माहिती अधिकार कायद्यावर तर के. व्ही जे. राव यांचे भ्रष्ट लोकसेवकांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत व्याख्यान होणार आहे. सदर कार्यक्रम शुभलक्ष्मी मंगल कार्यालय त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक येथे आयोजित करण्यात आले असून नोंदणी झालेल्या सहभागी कायदा प्रेमींसाठी सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आदी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाहेरून एक दिवस आधी येणाऱ्या कायदा प्रेमींची निवास व भोजन व्यवस्था ही करण्यात आली आहे. सदर संमेलन कुठलेही व्यक्ती विशेष व संस्थेच्या बॅनरखाली नसून महाराष्ट्र संबंध कायदा प्रेमींनी कायदा प्रेमींसाठी हे संमेलन आयोजित केले आहे. सदर संमेलनात भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र होऊ पाहणाऱ्या कायदा प्रेमींनी जरूर सहभागी व्हावे. व तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
महाराष्ट्रातून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कायदा प्रेमींनी भ्रमणध्वनी क्रमांक 8554069928 साहिल द्यानद्यान यांच्याकडे नाव नोंदणी करावी. अधिक माहिती करिता सेवानिवृत्त नायब तहसीलदार पंढरीनाथ कन्नोर 9423911695 व माहिती अधिकाराचे राष्ट्रीय प्रविण प्रशिक्षक गणेश शिंदे 9766542266 यांच्याशी संपर्क साधावा. असे विठोबा द्यानद्यान यांनी एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.