<
जळगाव – (प्रतिनिधी) -गरीब-गरजू महिलांना केली साडी-चोळी वाटप नवरात्रोत्सवाच्या काळात सर्वांच्या उत्साहाला मोठे उधाण आलेले असते. नवरात्रोत्सवाचे ९दिवस सर्व ठिकाणी गरबा, दांडिया खेळून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रोत्सव सर्व ठिकाणी आनंदात साजरा होत असला तरी अनेक गरजू, गरीब कुटुंबे मात्र हा उत्सव साजरा करण्यापासून वंचितच राहतात. या व्यक्तींनाही नवरात्रोत्सव साजरा करण्याचा अधिकार असून त्यांना तो मिळवून देण्यासाठी शहरातील मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन ने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. यावेळी फाऊंडेशन ने शहरातील गरीब महिलांना जसे की, नवरात्रीचे नऊ दिवस या उद्देशाने ९ साडी-चोळी वाटप केल्या. यामुळे या सर्वांच्या चेहऱ्यांवर हसू उमलले होते. नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव. नवरात्रीत या आदिशक्तीचा सन्मान अनोख्या पद्धतीने करण्यात आला. नवरात्रीत गरीब महिलांना नवीन साडी परिधान करण्यास मिळावी या उद्धेशाने गरीब महिलांना साडी-चोळी वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष सौ.अर्चना सुर्यवंशी यांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष- फिरोज शेख यांच्या सह निशा पवार, अमित माळी, चेतन निंबोळकर, सुनील गजभिये आदी उपस्थित होते.