<
जळगाव – राज्यात आदर्श ठरावा असा उपक्रम खासदार उन्मेशदादा पाटील हे चाळीसगावचे तत्कालीन आमदार असताना राबविला होता एका छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी हजारो कार्यकर्त्यांची यंत्रणा उभारून शासन प्रशासन व जनता यांचा सतत तीन दिवस समन्वय साधून लाखो जनतेला एकाच छताखाली आणून शासकीय योजनांची जत्रा भरवली होती. दि.27 ऑगस्ट 2019 ते 29 ऑगस्ट 2019 रोजी संपन्न झालेल्या या शासकीय योजनांच्या जत्रेत अनेक वर्षांपासून वंचित व कागदपत्रांची पूर्ततेअभावी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याबाबत उदासीन आणि वंचित जनता यांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून एका छताखाली आणून लाखो लोकांना लाभ देण्याची किमया उन्मेशदादा पाटील यांनी साध्य केली होती. तेव्हा या “उन्मेश पॅटर्नची” राज्यभर चर्चा होऊन राज्याने हा उपक्रम आदर्श असल्याचे गौरविले होते. या उन्मेश पॅटर्नच्या धरतीवर राज्य सरकारने आज शासकीय योजनेची जत्रा भरविण्याचा महासंकल्प केला असून उन्मेश पॅटर्नचे संकल्पक खासदार उन्मेश दादा पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री माननिय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे जत्रा पॅटर्न स्वीकारल्याबद्दल खासदार उन्मेशदादा पाटील शासनाचे आभार मानले आहेत.
जत्रा भरविण्याचे संकल्पक खासदार उन्मेशदादा यांच्याशी केली शासनाने चर्चा
चाळीसगाव येथे तत्कालीन आमदार उन्मेशदादा पाटील यांनी चाळीसगाव येथे दि. 27 ऑगस्ट 2019 ते 29 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित केलेल्या जत्रेबाबत केलेल्या उपाययोजना, जनजागृतीसाठी राबविलेली यंत्रणा व जनतेचा व शासनाचा अधिकाऱ्यांची समन्वय साधण्यासाठी उभारलेले शेकडो स्टॉल , यासाठी घेतलेल्या समन्वय बैठका या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी गेल्या महिन्यात बोलावले होते. त्या अनुषंगाने उन्मेशदादा पाटील यांनी शासकीय योजनेची जत्रा ची पूर्ण संकल्पना यासाठी राबविलेली यंत्रणा याचा विस्तृत अहवाल सादर केला. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राबवलेली तत्कालीन शासकीय योजनेची जत्रा बाबतचे सर्व बॅनर्स, पॉम्पलेट, लाभार्थीना केलेले आवाहन, आपण लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे घरपोच दिलेले पत्र, तेव्हाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वय आढावा ,मंत्री महोदयांचे उपस्थित झालेले उद्घाटन या सर्वांसह प्रत्यक्ष लाभ दिल्याबाबतचा छापील अहवाल याबाबत राज्यशासनाला अवगत केले या सर्वांची फलश्रृती आज राज्य शासनाने शासकीय योजनांची जत्रा प्रत्येक जिल्ह्यात भरून 75000 नागरिकांना योजनांचा लाभ एका छताखाली देण्यासंदर्भात महासंकल्प केला आहे.
उन्मेशदादांनी तालुक्यात केली जत्रेची “हॅटट्रिक”…….l
चाळीसगाव तालुक्यात तीनदा शासकीय योजनांची जत्रा आयोजित करण्यात आली होती. खासदार उन्मेशदादा पाटील तत्कालीन आमदार असताना मुख्यमंत्री समाधान शिबिराचे आयोजन 2 ऑक्टोंबर 2017 ते 19 फेब्रुवारी 2018 पर्यंत करण्यात आले होते. तसेच सात ते दहा एप्रिल 2018 या कालावधीत शासकीय योजनांची जत्रा कृषी महोत्सवाचे आयोजन करून तालुक्यातील जनतेच्या मनात शासकीय योजनांच्याबाबत मोठा विश्वास निर्माण करण्याचे काम उन्मेशदादा पाटील यांनी यावेळी केले होते. याच अनुभवातून 27 ऑगस्ट 2019 ते 29 ऑगस्ट 2019 या कालावधीत सर्वसमावेशक राज्यातील पहिली शासकीय योजनेची जत्रा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या जत्रेची दखल थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतली व हा शासकीय योजनांच्या जत्रेचा उन्मेश पॅटर्न हा राज्यभर लागू करण्याचे सूतोवाच केले होते. त्या अनुषंगाने राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ देण्याचा महासंकल्प करीत शासकीय योजनांची जत्रा राबविण्यासाठी शासकीय आदेश जारी केला आहे. यामध्ये 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत ही शासकीय योजनांची जत्रा राबविण्याचा संकल्प केला खऱ्या अर्थाने या योजनेचे संकल्पक खासदार उन्मेशदादा पाटील यांचे या अभिनव “उन्मेश पॅटर्न” बद्दल राज्यभरातून अभिनंदन केले जात आहे.