<
पाचोरा ;- शेतकऱ्यांच्या कापसाला १० हजार रुपये हमीभाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना पिकविमा भरपाई तात्काळ मिळावी. या रास्त मागण्यांसंदर्भात २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देते प्रसंगी शहर अध्यक्ष ऋषिकेश भोई, उपशहर अध्यक्ष यश रोकडे, रोहित पाटील, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, तालुका संघटक जितेंद्र नाईक, शहर सचिव श्रीकृष्ण दुंदुले, शहर संघटक निलेश मराठे, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष वाल्मिक जगताप, कृष्णा जगताप, अक्षय पाटील उपस्थित होते.
कपाशीला दहा हजार रुपये भाव मिळावा व पिक विम्याचे पैसे कुठलीही आडकाठी न आणता शेतक-यांना तात्काळ द्यावे. येणा-या आठ दिवसात या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ता रोको आंदोलन व पिक विमा कंपन्याच्या कार्यालयाला जावुन टाळे लावण्यात येतील व होणा-या परीणामास शासन व प्रशासन जबाबदार राहील. अशा आषयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांना देण्यात आले आहे. सदरचे निवेदन नायब तहसिलदार सुभाष कुंभार यांनी स्विकारले. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, जळगांव, तहसिलदार, पाचोरा व पाचोरा पोलिस स्टेशनला रवाना करण्यात आल्या आहेत.