<
डॉ. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेवर आधारित ‘एनलाइटनंट आत्रंप्रिनर’
जळगाव प्रतिनिधी (दि.13)- अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशियल स्कूल नेहमीच परिवर्तनात्मक आणि प्रयोगशील शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रगण्य असून सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबवित असते. आज इयत्ता ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अद्वितीय उद्योजकता कार्यक्रम सुरू केला, ज्यात या विद्यार्थ्यांना प्रथम अनुभव,व्यवसायाच्या रूढी, उद्योजक विचार आणि दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि दीर्घकालीन दृष्टीकोन विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
अतिशय वेगळा व परिणामकारक असा हा उपक्रम असून याचा शुभारंभ अनुभूती शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य जे.पी.राव, मनोज परमार,निलम समदानी व शिक्षकवृंद उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठीचे शिक्षण घेऊ नये, तर नोकरी देणाऱ्याचा विचार घेऊन आपला मार्ग निर्माण करावे असे प्रोत्साहित करणारे विचार सौ. निशा जैन यांनी मांडले.
डॉ. भवरलाल जैन यांच्या “स्टेटमेंट ऑफ पर्पज” या पुस्तकावर आधारित हा “आंत्रप्रिनर प्रोग्राम” असून विद्यार्थ्यांच्या मनात उद्योजक बनण्याचे बिजारोपन व्हावे, त्यांनी स्वतंत्र विचार करून देश घडवावा यासाठी हा कार्यक्रम आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना खऱ्या उद्योजकांच्या गुणधर्मांबद्दल समजावून सांगणे. भविष्यात शाळेचे उद्दिष्ट-विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी प्रदान करणे आणि उद्योग व वाणिज्य या विषयावर विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण प्रदान करणे असा हा कार्यक्रम आहे.