लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
गावकऱ्यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,विद्यार्थ्यांचे केले कौतुक.
लोहारा तालुका पाचोरा येथे दिनांक 25 रोजी दत्त जयंती निमित्ताने यात्रा उत्सव आनंदात पार पडला. यात्रेसाठी लोहारा परिसरातील सर्व महिला नागरिक लहान थोर मंडळी यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती परंतु यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराच्या समोर व यात्रेच्या सर्व मैदानावर अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते.ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा पडलेला होता.हे लोहारा शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक एस .टी .चिंचोले, उप मुख्याध्यापक श्रीमती यु.डी.शेळके मॅडम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना घेऊन यात्रेचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. व त्या ठिकाणी असलेला कचरा जागीच पेटवून नष्ट देखील केला. यामध्ये स्वतः शिक्षकांनी देखील हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यामध्ये सहभाग नोंदविला.यावेळी समाजसेवक तथा पत्रकार गजानन क्षीरसागर,गोकुळ माळी,कौतिक शिंदे, गुणवंत क्षीरसागर, प्रकाश शिंदे, मुख्यध्यापक ए.सटी.चिंचोले, यु. डी. शेळके मॅडम , एस. बी. सावकार, वि .एम.शिरापुरे ,पी.एम.पाटील, अमोल घोंगडे,निकम सर, सिसोदे सर, एस. एस पाटील. यांनी परिश्रम घेतले. ही झालेली स्वच्छता बघून गावकऱ्यांमधून शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.