<
लोहारा ता.पाचोरा (रिपोर्टर ईश्वर खरे)
येथे दिनांक ०२/०२/२०२४ रोजी माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमा अंतर्गत डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या विद्यालयातील सेमीच्या विद्यार्थ्यांकडून निवडणूक उपक्रम राबविला गेला.
सविस्तर वृत्त असे की विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस टी चिंचोले सरांनी विद्यार्थ्यांना निवडणूक उपक्रम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मतमोजणी पर्यंत निवडणूक प्रक्रिया कशाप्रकारे राबवली जाते याची माहिती विशद केली,निवडणूक आयुक्त कशाप्रकारे निवडणूक जाहीर करतात तसेच निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांची कामे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. नंतर विद्यार्थ्यांमधूनच उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आली व नंतर त्या अर्जांची छाननी करण्यात येऊन उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. नंतर निवडणूक तारीख जाहीर करण्यात आली.
एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामध्ये मुलींसाठी तीन जागा व मुलांसाठी तीन जागा ठेवण्यात आल्या होत्या.
मतदान कक्षाची निर्मिती यावेळी करण्यात आली विद्यार्थ्यांमधूनच मतदान अधिकारी१,२,३ म्हणून निवड करण्यात आली. व सहाय्यक कर्मचारी १ अशा प्रकारे मतदान अधिकारी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मतदान केंद्रामध्ये मतदान घेण्यात आले. ही प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आपले मत पेटीमध्ये जमा केले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली त्यामध्ये सहा उमेदवारांमधून ऋषभ प्रदीप क्षीरसागर या विद्यार्थ्याला एकूण २४ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आपण स्वतः आज मतदान करीत असल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक एसटी चिंचोली तसेच पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे उपशिक्षक आर आर खोडपे,आर जे निकम,आर सी जाधव, बी एन पाटील, तसेच पत्रकार तथा समाजसेवक गजानन क्षीरसागर व विद्यालयातील सर्व शिक्षकांचे योगदान लाभले.