<
भडगाव-(प्रतिनीधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत संस्थेचे संस्थापक चेअरमन कै.कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचा १८वा पुण्यस्मरणनिमित्त शाळेत दि.२३ सप्टेंबर पासून विविध स्पर्धांच आयोजन शाळास्तरावर करण्यात आलेले होते..सदर सप्ताहानिमित्त शाळेत भाषण स्पर्धा, निबंधस्पर्धा,हस्ताक्षर शुध्दलेखन स्पर्धा,संगित खुर्ची, लिंबूचमचा, गोणपाट स्पर्धा, १००मीटरधावणे, चित्रकलास्पर्धा, रंगभरण स्पर्धा अशा विविध विद्यार्थी विकासात्मक स्पर्धांच आयोजन शाळा स्तरावर करण्यात आलेल होत.सदर सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आज अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमांच अध्यक्षस्थान श्री. प्रशांतराव विनायकराव पाटील संस्थेचे संचालक व अवर सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांनी भूषवलं तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.जयवंतराव बागल लाभले.
सर्वात प्रथम श्री .प्रशात दादां व प्रमुख अतिथीच्या च्या हस्ते माता सरस्वती व संस्थेतील सर्व दिवंगत पूज्यनिय व्यक्तींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.श्री. दादासाहेब प्रशांतराव पाटील यांना सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई तर्फे सन २०१४-२०१५ चा गुणवंत अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार शाळेचे मुख्याध्यापक कमलेव शिंदे व शाळेतील सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. तदनंतर पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे आकर्षक बक्षीसे दादासाहेब प्रशांत पाटील, श्री.जयवंतराव बागल, शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे,ज्येष्ठ शिक्षिका संगिता शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं.
सर्व स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला. बक्षीस स्विकारतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता.मनोगतात शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे ह्यांनी कै.तात्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊन ताथ्यासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच शाळा व संस्थेच्या विकासात आदरणीय प्रशांत दादांची अनमोल अशी साथ लाभत आहे. दादांच्या मार्गदर्शनामुळे काम करण्याची प्रेरणा मिळत अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रशांत दादां यांनी संस्थेतील सर्व शाळांकडून विद्यार्थ्यांचा सखोल गुणवत्ता विकास साधण्याबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या.प्रशांत दादांनी स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तोंडभरून स्तुती करून पाठीवर कौतुकाची थाप दिली..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षक श्री.ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले तर फलक लेखन अनंत हिरे यांनी केले.
सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील उपशिक्षिका संगिता शेलार अनिता सैंदाणे,सुनिता देवरे, उपशिक्षक सचिन पाटील,रविंद्र पांडे,अनंत हिरे,ज्ञानेश्वर गांगुर्डे,सुयोग पाटील व राहूल देशपांडे यांनी परिश्रम घेतले.