<
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहापुरा येथे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या या कार्यक्रमांमध्ये एकूण 38 कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये अगोदर बालविवाह या नाटिकेत गावात घोड्यावर नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली व बालविवाह दाखवून पोलिसांनी कशाप्रकारे नवरदेव नवरी या सर्वांना अटक केलेले दाखवले विविध नाटिका देशभक्तीपर गीते, अंधश्रद्धा पर नाटिका, भक्ती गीते, असे विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी शहापुरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप भाऊ राजपूत होते प्रमुख अतिथी म्हणून म्हसास गावचे सरपंच तसेच शहापुरा गावचे सरपंच योगेश भाऊ राजपूत, व उपसरपंच सुनील भाऊ राजपूत तसेच गाव ईश्वर भाऊ परदेशी, विनोद भाऊ परदेशी, राजूभाऊ परदेशी, उपस्थित होते .कार्यक्रमामध्ये सादर केलेल्या विविध नृत्यांना व नाटिकांना उपस्थितांनी पंधरा हजार रुपये बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला यावेळी कार्यक्रमाला वेगवेगळ्या मान्यवरांनी उपस्थिती दिली यामध्ये म्हसास शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव सर, कळमसरा शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पवार सर ,व कुंभार खान शाळेचे मुख्याध्यापक किशोर चौधरी सर, तसेच कासमपुरा शाळेचे मुख्याध्यापक डी आर पाटील सर ,तसेच मनोहर पाटील सर, दिलीप चव्हाण सर, निकम सर ,तुकाराम पाटील सर, तपोने सर ,गायकवाड सर, किशोर पाटील सर, बोरसे सर, प्राजक्ता मॅडम, रोकडे सर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष आणि सदस्य व मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी तेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी गावातील तरुण मित्र मंडळींनी तसेच सरपंच तथा उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व शहापुरा गावातील नागरिक पोलीस पाटील व केंद्रातील सर्व शिक्षक बांधवांनी मदत केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर पाटील सर यांनी केले व सर्वांचे आभार शाळेचे उपशिक्षक रविंद्र पाटील सर यांनी मानले.