लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
जामनेर मतदार संघातील लोकांनी गिरीश महाजन यांना निवडून दिलं होतं..परंतु काही महिन्यात येथील नागरिकांना त्यांच्या कामाची प्रचिती आली, अनेकांनी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त करत अनेक युवक कार्यकर्त्यांनी तालुक्याचे नेते माजी जी प सदस्य डिगम्बर दादा पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष वंदना ताई चौधरी, लोकसभा प्रमुख मनोहर दादा पाटील,तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील, प्रशांत पाटील,किशोर खोडपे,आशिष दामोदर, रुपेश पाटील, प्रलाद बोरसे यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश..
लोहारा येथील जेष्ठ कार्यकर्त्यांनी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला असून इतर सर्व पक्षांचा अनुभव घेतला असता न्यायिक वागणूक न मिळाल्यामुळे सन्मानाचे राजकारण करण्यासाठी आपण प्रवेश करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले..
या वेळी डी के पाटील म्हणाले – शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. आणि यांच्या विचारांवर विश्वास ठेवून तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा एकमेव पक्ष सक्षम आहे, त्यासाठी सर्व युवक या पक्षात प्रवेश करीत आहेत असे उद्गार यावेळी डी के पाटील यांनी केले..भाजपचा खरा चेहरा आता आपल्या समोर आला असून आपण भाजपला थारा देणार नाही अश्या भावना गावातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या..जगातील सर्वात मोठ्या तारुण्य असलेल्या देशात तरुणांना केंद्रबिंदू मानून जे सरकार काम करेल तोच पक्ष येत्या काळात टिकेल कारण आजचा तरुणवर्ग फार सुशिक्षित आहे, सुजाण आणि भविष्याचा वेध घेणारा आहे..येणाऱ्या काळात पक्षाच्या माध्यमातून शेतकरी , तरुण, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी सांगितले..आजच्या बैठकीमध्ये पुढे येऊ घातलेल्या निवडणुका संदर्भात चर्चा करून पक्षाचे ध्येयधोरण आदेश सर्वांनी मान्य करायचा असा एकमत ठराव आपण सर्वानी करावे हि नवीन कार्यकर्त्यांनी सूचना दिल्या..
यावेळी प्रदीप पवार, आशिष गिते, शुभम चौधरी, बापू देशमुख, शरद देशमुख, सत्यवान खरे, कैलास कोळी, लोटू काळदाते भावडू शृंगारे, बापू बाविस्कर, गफ्फार मिस्तरी, रज्जाक दादा, शेख इस्माईल शेख हुसेन, चांदखान पठाण, शेख उस्मान शेख रहमान, आनंदा सुरवाडे, राजेंद्र गोंधळे, अनिल भावराव पाटील, कडुबा भावराव देशमुख, भरत देशमुख, गजानन सरोदे, शुभम अंबिकार, नाना चौधरी येशूआण्णा शेळके, भैया कोळी, पंकज माळी सुरेश कोळी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते..
मित्रांनो शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या क्रांतिकारी पक्षामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आशा उपस्थितांनी घोषणा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर खरे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन लोटू भाऊ काळदाते यांनी केले.