<
जळगाव दि १०— येथिल डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक होमीओपॅथी दिवस निमीत्ताने चर्चासत्र आयोजित करून साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सॅम्युअल हॅनेमन होमीओपॅथी फोरमचे जळगाव जिल्हाध्यक्ष यशवंत पाटील, डॉ. महेंद्र पवार, डॉ. दिपक पाटील,डॉ. सरीता पाटील, प्राचार्य डॉ. डी.बी पाटील यांची प्रमुख उपस्थीती होती.सर्व प्रथम होमीओपॅथी जनक सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आयोजित चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना चित्रफिती व चलचित्राच्या सहायाने मान्यवरांनी होमीओपॅथी केस टेकींग अँन्ड पॅथालॉजीकल केसेस यावर बोलतांना विविध आजारांवर होमीओपॅथी उपचार कसे प्रभावी ठरत आले आहे हे विषद केले. यानंतर विदयार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार लुचिता नेहेते यांनी केले. डॉ. अमोल चोपडे, डॉ.श्वेता डोगंरे, डॉ. पंकज शर्मा, डॉ. कुणाल फेगडे, रूचिता पाटील, वसंत बडगुजर, श्रध्दा पाटील यांनी परिश्रम घेतले