<
माणसाची ओळख नष्ट होऊ नये म्हणून आशा विचार प्रधान स्पर्धांची आवश्यकता व
माणूस म्हणून जगतांना माणसाला चांगल्या सवयींची गरज
जळगाव- दि. ३० सप्टेंबर २०१९ “आजकाल विचार पीठे कमी होत चालली आहेत. तरुणांना व्यक्त होण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. जो विचार वक्तृत्व स्पर्धांमधून मांडला जाईल त्याचे त्या स्पर्धकांनी कृतीत रुपांतर करावे. चांगला वक्ता हजारांमधून एकच निपजतो. त्याच्याजवळ अभ्यास, आचार, विचार आणि अभिव्यक्ती कौशल्याची शिदोरी असावी. माणूस म्हणू जगतांना चांगल्या सवयी आवश्यक आहेत. त्याद्वारे माणुसकी सांभाळता येत असते. या स्पर्धा म्हणजे माणसाची भंगार अवस्था होऊ नये म्हणून केलेली रचना आहे. त्याचा विचार सर्वांनी सद्सद् विवेकाने करावा.” असे प्रतिपादन जिल्हा परिषद, जळगावचे जिल्हाधिकारी श्री.अविनाश ढाकणे यांनी मू.जे.महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले.
सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री.दिगंबर लोखंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील युवा शक्तीने ‘स्वच्छता ’ या विषयात आपले योगदान दयावे, यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरेल. सदर स्पर्धा युवा पिढीच्या मनात प्लास्टिक मुक्ती आणि निसर्ग संवर्धन याविषयी आश्वासक मत निर्माण करेल.”
स्वच्छता मिशन कक्ष, जि.प.जळगाव आणि वादविवाद मंडळ, मूळजी जेठा महाविद्यालय,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मू.जे.त करण्यात येते.
समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ. महेंद्र ठाकूरदास, पुणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थी दशेत केलेल्या अशा स्पर्धा आपल्या भावी करियरसाठी किती महत्वाचे आहे, यावर आपले विचार प्रकट केले. अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. उदय कुलकणी सर यांनीही विद्यार्थ्यांना वक्तृत्व कला कशी आत्मसात करावी, याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की वक्तृत्त्व कला आत्मसात करण्यासाठी आपले चौफेर वाचन असले पाहिजे. आपल्यात सभाधैर्य येण्यासाठी आपण अधिकाधिक सराव केला पाहिजे. आपल्या संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजे.
या स्पर्धेचे वरिष्ठ गटाचे परीक्षण प्रा.डॉ. जुगलकिशोर दुबे, मू.जे.महाविद्यालय, डॉ. योगिता चौधरी, गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी आणि डॉ.नारायण अटकोरे, बाहेती महाविद्यालय यांनी केले. सूत्रसंचालन स्पर्धेचे आयोजक प्रा.विजय लोहार व वादविवाद मंडळ प्रा.योगेश बोरसे, डॉ.सविता नंदनवार, सागर जाधव, करण माळकर, निलेश लोहार यांनी आयोजनात परिश्रम घेतले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
वरिष्ठ गट
प्रथम क्रमांक- अंजली संग्राम पाटील , पी.ओ.नाहटा महाविद्यालय, भुसावळ, रु.५००१ हजार व करंडक
द्वितीय क्रमांक:- निलेश संजय बागुल , प्रताप महाविद्यालय, अमळनेर रु.३००१ हजार व करंडक
तृतीय क्रमांक :- प्राची सुरेश सोनार , अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय, बांभोरी रु.२००१ हजार व करंडक
उत्तेजनार्थ १ – पायाल सुभाष बारी , आ.र.भा.गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी रु.१००१ व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ २ – साक्षी विनोद दुधानी, धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, फैजपूर रु.१००१ व प्रमाणपत्र