<
जळगाव- (प्रतींनिधी ) – महाराष्ट्रातील बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार यांची घोषणा आज बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी केली .
यामध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर वगळता या मध्ये उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे – अरुणा संजीवं बावीस्कर –चोपडा ,हाजी मुश्ताक सय्यद कमरुददिन- रावेर, प्रा.सुनील दादा सुरवाडे –भुसावळ,शफी अब्दुल नबी शेख –जळगाव शहर , उत्तम पंडित सपकाळे उर्फ बेनहर टेलर – जळगाव ग्रामीण, श्रावण धर्मा वंजारी उर्फ नाना महाराज – अमळनेर, मोरसिंग गोपा राठोड- चाळीसगाव, नरेश पंडित पाटील- पाचोरा, सुमित चव्हाण- जामनेर, याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राहतील असे प्रमोद इंगळे जिल्हाअध्यक्ष जळगाव लोकसभा तसेच विनोद सोनवणे जिल्हाअध्यक्ष रावेर लोकसभा यांनी अधिकृत पत्राद्वारे कळविले आहे.