<
ही तर चूक माणसाचीच आज होतोय पर्यावरणाचा जगभर ऱ्हास न गंजणारी वजना हलकी टिकाऊ आनंदे केली निर्मिती प्लास्टिक खास !
न कुजणारं चारशे वर्ष अविघटनशीलप्लास्टिकचा कोपऱ्याकोपऱ्यात वास प्लॅस्टिक भस्मासुर अक्राळविक्राळ रौद्र रूपनिसर्ग वाचविण्या घ्या प्लॅस्टिक बंदचा ध्यास !
शेता बीजांकुर फुटण्या स्वयंघोषित बहिष्कारशासनानेही ठरविला घालविण्या दंड खासकर्तव्य माणूस म्हणून प्लॅस्टिक बंद निर्धारघेऊ द्या जलचर प्राणी मुक्या जीवा श्वास !
घ्या अविचल शपथ करून विचारधरू प्लॅस्टिक मुक्त भारत अभियानाची कासमी ही नाही आणि तू ही नाहीटाळू प्लॅस्टिकचा वापर सर्रास !
प्लॅस्टिकला देऊया निरोप चलेजाव नाराबाळगू कापडी कागदी पिशवी जवळपासप्रदूषण मुक्त ठेऊ पर्यावरण सुंदरकरू वसुंधरेचे रक्षण घेऊ मोकळा श्वास !
श्रीमती ज्योती राणे शिक्षिका- साळवा, ता.धरणगांव, जि. जळगांव