<
जळगाव -दि 14 (जिमाका ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण ५8.47% तर रावेर लोकसभा मतदार संघात ६४.२८% मतदान झाले.
सोमवार दि. १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला दोन्ही मतदार संघात सुरुवात झाली. सांयकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. सकाळी ऊन होण्याच्या आधी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या . जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या अल्पबचत भवन येथे मतदान केंद्रावरची हालचाल टिपण्यासाठी वेबकास्टिंग कक्ष स्थापन करण्यात आला होता. स्वतः जिल्हाधिकारी दिवसभर या वर लक्ष ठेऊन होते. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेऊन असल्यामुळे मतदान शांततेत पार पडले.
सकाळी ११ ते १ या कालावधीत सर्वाधिक मतदान
जिल्ह्यात सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत सर्वाधिक मतदान झाले. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळच्या वेळेत गर्दी झाल्याचे दिसून आले. दुपारी उन्हाची वेळ झाल्यानंतर मात्र गर्दी ओसरली.
मतदानाची टक्केवारी
जळगाव लोकसभा मतदार संघात ६ लक्ष २८ हजार १२३ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ५ लक्ष ३७ हजार ८२७ महिला मतदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजाविला. तर १८ तृतीयपंथी यांनी मतदानाचा हक्क वाजविला. एकूण ६०.५५% पुरुष, ५६.२२% महिला व २१.१८% तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे एकुण ५८.४७% मतदान झाले.
रावेर लोकसभा मतदार संघात ०६ लक्ष २१ हजार ९८३ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ०५ लक्ष ४८ हजार ९५० महिला मतदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजाविला, तर ११ तृतीयपंथी यांनी मतदानाचा हक्क वाजविला. एकूण ६६.०५% पुरुष, ६२.३८% महिला व २०.३७% तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे एकुण ६४.२८% मतदान झाले.
मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव स्पर्धा, त्याचा निकाल जाहीर
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान वादविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून विशेष स्पर्धा
आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परीक्षक मंडळनियुक्ती करण्यात आले होते. आज त्याचा निकाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केला.
१. आकर्षक वेशभुषा नवयुवक मतदार (वयोगट १८-२३) या गटात ( इन्स्टॉग्रामवरील नावे कंसात
1. श्री. उमेश राजपूत (mr.umesh_rajput_60k)
2. श्री. अमेय (amey_at_insta)
3. श्री. मोहित सोनी (mohitsoni2805)
२. आकर्षक वेशभुषा नवयुवती (वयोगट १८-२३) मतदार या गटात
१. मयुरी सुर्यवंशी
2. श्री. वाघ अक्षय (waghakshay388)
3. धनश्री (dhanashri521)
३. आकर्षक मोठा समुह (वयोगट १८-२३) या गटात
1. जैन प्रतीक (Jainpratik48)
2. गौरव सिनकर (Gurava_shinkar)
3. रवींद्र बोरसे (Ravindra_borase_2.0)
४. आकर्षक बेस्ट स्टोरी (खुला गट) या गटात
१. प्रा. शंतनु महाजन (फैजपुर)
2. श्री. संजय काशिनाथ कोळी (चोपडा)
3. जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, जळगांव
५. आकर्षक बेस्ट क्रिएटिव्ह (खुला गट) या गटात
1. अंबिका फोटो स्टुडिओ (ambika_photo_studio)
2. 94.3 माय एफ एम (R. J. Shivani & R. J. Deva)
3. भरारी व उडाण संघ (म.न.पा. जळगांव)