<
दिनांक २३/७/२०२४ गेल्या काही दिवसांपासून आपल्या बस डेपो मध्ये चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. व या घटनांचा तपास करण्यासाठी कॅमेरे या ठिकाणी पाहिले असता सदर कॅमेरे बंद अवस्थेत आढळले व चोरीच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.आपल्या येथून जळगाव जिल्ह्यातील खेडोपाडातील गरीब हातावर पोट भरणारे लोक हे प्रवास करत असतात. व या चोरीच्या सुळसुळाट मुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.सोबतच चोरांना पकडण्यासाठी तपास केल्या असता कॅमेरे बंद अवस्थेत आढळल्याने सदर चोरांना सुद्धा हे सोयीचे होत आहे.
याच पार्श्वभूमीवर सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन ॲड. दीपक सपकाळे सर यांचा आदेशाने महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन कडून आज निवेदन देण्यात आले त्यावर दि.ग बंजारा साहेब विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दखल घेत तात्काळ सदर कॅमेरा चालू करण्याचे आदेश दिले व आजच काही कॅमेरे चालू झाले असून बाकीचे कॅमेरे तात्काळ चालू होतील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. सदर निवेदन देण्या करिता जिल्हाध्यक्ष ॲड.रोहन महाजन, महानगर प्रमुख प्रथमेश मराठी, ॲड. दुर्गेश भोजने उपस्थित होते.