<
जळगांव(धर्मेश पालवे):-जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जी एस ग्राउंड जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, या ठिकाणी जिल्ह्यातील बहुसंख्य लोकांनी आपल्या समाजसेवा करण्याची शपथा घेत, जनसेवेचे वचन जिल्ह्यातील जनतेला दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या मागील जी एस ग्राउंड वर अनेकांनी मोठं मोठी व्याख्यान, सभा, व मेळावे घेतले आहेत.आणि याच ठिकाणी असणाऱ्या “शिवतीर्थ व्यासपीठ”वर भाषनेही केली आहेत. या व्यासपीठाची स्थापना सन १९९९ साली त्या वेळचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा भिलाभाऊ सोनवणे, व उपाध्यक्ष मा पुरुमल चौधरी यांनी केली आहे.आज या व्यसपीठाला २० वर्ष होऊनही या व्यासपीठाकडे जिल्ह्यातील राजकीय नेते व जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत अस चित्र आहे.
या व्यासपीठा समोर एक कचरा कुंडी असून, बाजूलाच असणारे कठळे हे मुतारी म्हणून लोकं वापरत आहेत. व्यसपीठाला लागून असणाऱ्या पायऱ्या पडक्या झाल्या आहेत, व छत गळतीचे ग्रासले आहे , खुल्यावर मुतारी म्हणून वापरणाराची संख्या वाढणारी या ठिकाणी दिवसभरात दिसून येते. जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ व्यासपीठ कडे पाहून असंख्य प्रश्न उपस्तीत होतात, फक्त कामापूरते उपभोग घेऊन या वास्तुकडे पाहण्यात आले आहे.स्वच्छ भारत ही योजना या ठिकाणी मृगजळ सारखी भासते असाही सूर काही लोकांनी बोलून दाखवला. या वास्तुचे ग्रहण कधी सुटणार कुणास ठाऊक?राजकीय लोकांना याची दखल घ्यावीशी वाटेल का? जिल्हा परिषद या कडे गांभिर्याने लक्ष देईल का?अश्या प्रश्नांच्या भडीमारात शिवतीर्थ व्यासपीठ अडकल्याच दिसत आहे.