<
जळगांव – महसुल हा प्रत्येक व्यवस्थेचा पायाभुत घटक असतो. आपल्या महावितरण कंपनीतील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी महसुलासाठी चांगली वीज सेवा, ग्राहक तक्रारींचे निवारण, अचुक बिलींग व वसुली या चतु:सुत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. तेंव्हाग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे अचुक बिलिंग होण्यासाठी नादुरूस्त मीटर बदलण्याचे काम तातडीने पुर्ण करा. ग्राहकांना विश्वसनीय,अखंडित अन् दर्जेदार वीजसेवा, अचुक बिलींगसह थकबाकी वसुली व ग्राहक तक्रारींची सोडवणुक या कामी कसुर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कोंकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांनी दिला.
सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांचे प्रमुख उपस्थितीत धुळे व नंदुरबार मंडळातील सर्व कार्यकारी अभियंता, उप विभागीय अभियंता , उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) व सहाय्यक लेखापाल यांची आढावा बैठक दि.13 जुलै 2019 रोजी 11.30 वाजता लघु प्रशिक्षण केंद्र, साक्री रोड,धुळे येथे संपन्न झाली. या बैठकीस जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता मा.श्री. दिपक कुमठेकर, अधिक्षक अभियंता (संचालन) श्री. शैलेंद्र राठोर, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री. योगेश खैरनार ,अधिक्षक अभियंता श्री. प्रकाश पौणिकर (धुळे मंडळ), अधिक्षक अभियंता श्री. राजेशसिंग चव्हाण (नंदुरबार मंडळ), अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) श्री. चंद्रशेखर मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्सव काळात सुरळीत सेवेसाठी प्रतिबंधात्मक देखभाल दुरूस्ती करा
आगामी काळातील गणेशोत्सवासह सर्व धार्मिक उत्सव काळात सुरळीत वीजसेवेसाठी व अप्रिय घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल दुरूस्तीची कामे गतीने करा.
बिलिंग व नादुरूस्त मीटर बदल करणे कामी दोन अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई
बिलिंग प्रक्रियेतील अकृषीक वीजवापर समाधानकारक नसल्याने व नादुरूस्त मीटर बदलणे कामी हयगय केल्याबद्दल दोन अभियंत्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश त्यांनी बैठकीत दिले. सेवेतील सुधारणांसाठी व वेळेत कामे होणेसाठी वरिष्ट अधिकाऱ्यांनी प्रभावी पर्यवेक्षण करावे, अशा सुचना दिल्या.
सुरळीत वीजसेवेसाठी कर्मचाऱ्यांना फीडरचे पालकत्व द्या
ग्राहक व महावितरणचे नुकसान टाळण्यासाठी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक फिडरचे पालकत्व कर्मचाऱ्यांना द्या. एका महिन्यात एका फिडरवर ३० मिनिटांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्यास संबधितास जबाबदार धरून कडक कारवाई करण्यात येईल.
अनाधिकृत वीजवापर, वीजचोरी थांबवा ;वाणिजिक्य हानी कमी करा
वीजजोडणी देताना ग्राहकांचा वीजवापर तपासा. वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडीत ग्राहकांची पाच टक्के तपासणी वेळेत करा. वाणिजिक्य हानी कमी करण्याचे दृष्टीने ग्राहकांकडून अनाधिकृत वीजेचा वापर केला जातो. त्याकडे डोळेझाक करू नका. वीजचोरीस आळा घालण्यासाठी उपाययोजना करा.
वीजमीटर उपलब्ध ;ग्राहकांना वेळेत वीज जोडणी द्या
ग्राहकांना वीजमीटर देताना चुकीची पध्दत अवलंबु नका. नवीन वीज जोडणीची मागणी करणाऱ्या ग्राहकांना वेळेत वीज जोडणी देण्यात यावी. वीज मीटरचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तेंव्हा ग्राहकांची दिशाभुल करूनका.
‘एचव्हीडीएस’सह सर्व योजनेची कामे लवकर पुर्ण करा
उच्च दाब वितरण प्रणाली ( एचव्हीडीएस ) योजनेतीलकामाबाबत समाधान व्यक्त करून मा.सहवयवस्थापकीय संचालकांनी सर्व योजनांची कामे लवकर पुर्ण करण्याची सुचना दिली.
अधिकाऱ्यांनी दौरे करून मासिक कामाची दैनंदिनी सादर करा
अधीक्षक अभियंत्यासह सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दौरे करावे. दौरे करून मासिक कामाची दैनंदिनी आपल्या वरिष्ट कार्यालयाकडे सादर करावी.
कायद्याच्या कक्षेत रहा ; सेवेच्या कृती मानकांचे पालन करा
वीजसेवेच्या कृतीमानकांचे पालन करा. कायद्यांच्या नियमांच्या कक्षेत राहून कामे पार पाडा. प्रमाणिकपणे काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्र दिले जाईल. हेतुपुरस्सर चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. अशी तंबी सहव्यवस्थापकीय संचालक यांनी दिली. दैनंदिन काम करताना तंत्रज्ञानाचा वापर करा. डॅशबोर्डचा वापर करा, असा सल्ला दिला.
धुळे ग्रामीण विभाग कार्यालय परिसरात वृक्षारोपण –
धुळे ग्रामीण विभाग कार्यालय परिसरात सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजयकुमार काळम पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
उद्योजक संघटना प्रतिनिधींसमवेत बैठक –
सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजयकुमार काळम पाटील यांनी उद्योजक संघटना प्रतिनिधींसमवेत चर्चा करून धुळे, शिरपुर एमआयडीसीतील वीज समस्या प्राधान्याने सोडवू, असे सांगितले.
कार्यक्षेत्रात तपासणी भेटी –
सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजयकुमार काळम पाटील यांनी धुळे शहरातील गरूड कॉम्प्लेक्स ,माहेश्वरी नगर चितोड रोड या परिसरात नमुनास्वरूपात कायमस्वरूपी वीज खंडीत ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली. एके ठिकाणी अनियमितता दिसुन आल्याने तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याचे त्यांनी आदेश दिले. ग्राहकांना अधिकृत वीज वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. दोषी व कामचुकार अधिकाऱ्यांना शास्ती तर जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्यांना पुरस्कृत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.