<
विकासात्मक कामांना प्राधान्य, जळगावात मेळावा संपन्न
जळगाव – बाजार समितीचे माजी सभापती लकी टेलर जळगाव ग्रामीण मतदार संघातून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे, आपण मतदारांना कुठल्याही भूलथापा देणार नाही, जे बोलू ते करू याप्रमाणे मतदार संघात एकही कच्चा रस्ता दिसणार नाही, असे आश्वासन लकी टेलर यांनी दिले आहे. जळगाव तालुक्यातील औचित हनुमान येथील मेळाव्यात ते बोलत होते.
लकी टेलर यांची उमेदवारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर मोठे आव्हान मानले जात असून, लकी टेलर यांना कार्यकर्ते व मतदारांमधून मिळणारा प्रतिसाद बघता, मतदारसंघात परिवर्तनाचे संकेत वर्तविले जात आहे.
लकी टेलर यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून 4 ऑक्टोबर रोजी ते अर्ज दाखल करतील. भाजपसह अनेक शिवसेना कार्यकर्ते लकी टेलर यांच्या सह सक्रिय आहेत. बाजार समितीत सभापती असताना समितीला नफ्यात आणण्यासाठी त्यांनी अनेक महत्वाची पावले उचलीत, त्यांनी अनेक महत्वाचे बदल घडवून शेतकरी, कामगारांना न्याय दिला. जळगाव ग्रामीण मतदार संघात गेल्या पाच वर्षात कामांची बोंब असल्याने, मतदारांमधून बदलाची हाक देण्यात येत आहे, त्यासाठी लकी टेलर हवं योग्य पर्याय असल्याचा सूर नवतरुण मतदार, शेतकरी, सामन्यांमधून उमटत आहे. त्यामुळे लकी टेलर यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे, भूलथापा देणाऱ्या नेत्यांपासुन सुटका करून मतदार संघाचा खरा कायापालट करेल, असे लकी अण्णा यांनी म्हटले आहे, त्यांच्या या प्रतिसादामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघाकडे जिल्हाभराचे लक्ष लागले आहे.