<
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून 27 जणांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेसपाठोपाठ मनसेनेही उमेदवार यादी जाहीर केल्याने यंदाच्या निवडणूक चुरशीची होणार असल्याचं बोललं जातं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मनसेच्या इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. यात मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलालाही मनसेने तिकीट दिली आहे.
सिंदखेडा येथून धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
- कल्याण ग्रामीण – राजू पाटील
- कल्याण पश्चिम – प्रकाश भोईर
- नाशिक पूर्व – अशोक मुर्तडक
- माहिम – संदीप देशपांडे
- हडपसर – वसंत मोरे
- कोथरुड – किशोर शिंदे
- नाशिक मध्य – नितीन भोसले
- वणी – राजू उंबरकर
- ठाणे – अविनाश जाधव
- मागाठणे – नयम कदम
- कसबा पेठ – अजय शिंदे
- सिंदखेडा – नरेंद्र धर्मा पाटील
- नाशिक पश्चिम – दिलीप दातीर
- इगतपुरी – योगेश शेवरे
- चेंबूर – कर्णबाळा दुनबळे
- कलिना – संजय तुर्डे
- शिवाजीनगर – सुहास निम्हण
- बेलापूर – गजानन काळे
- हिंगणघाट – अतुल वंदिले
- तुळजापूर – प्रशांत नवगिरे
- दहिसर – राजेश येरुणकर
- दिंडोशी – अरुण सुर्वे
- कांदिवली पूर्व – हेमंत कांबळे
- गोरेगाव – विरेंद्र जाधव
- वर्सोवा – संदेश देसाई
- घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
- वांद्रे पूर्व – अखिल चित्रे