<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील भाजपचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे हे जळगाव शहरातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आज रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातील समस्यांसाठी आवाज उचलला आंदोलन केलं, होणार्या भ्रष्टाचारविरुद्ध आंदोलन केलं आरक्षित जमिनीच्या विरोधात मी आवाज उचलला असे अनेक प्रश्न जळगाव शहरातील समस्यांचे होते जनतेच्या समस्या होत्या, त्या सोडवण्याचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि मी 30 वर्षापासून या पक्षात एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आहे आणि यापूर्वी पक्षासाठी मी नेहमी एकनिष्ठ व इमानदारीने कार्य केलेले आहे. आज मी जळगाव शहर विधानसभेसाठी इच्छुक असतांना मला या ठिकाणी डावलण्यात आले असल्याने मी माझी अपक्ष उमेदवारी जाहीर करतो असे पत्रकार परिषदेत डॉ. अश्विन सोनवणे यांनी सांगितले.
शहरातील प्रत्येक नगरसेवकांना व कार्यकर्त्यांना भेटणार आहे आणि पक्षात निश्चितच नाराज नगरसेवक कार्यकर्ते आहेत ते निश्चितच माझ्या सोबत राहतील अशी मला आशा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.