<
जळगाव दि.25 ( जिमाका ) विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 तारखेपासून लागू करण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तो पर्यंत राज्यात आचार संहिता लागू असल्याने अनेक शासकिय कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. त्यातील एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे लोकशाही दिन.
सामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या, अडचणी यांचा तात्काळ निपटारा व्हावा म्हणून जिल्हाधिकारी यांच्या दालनात नागरिकांच्या सोयीसाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन कार्यक्रम आयोजित केला जात असतो. मात्र सध्यस्थितीला राज्यात आचारसंहिती सुरु असल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रांमध्ये निवडणूकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्यास्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी तरतुद नमुद आहे.
त्यामुळे आचारसंहितेमुळे जिल्हास्तरावरील येत्या नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी म्हणजेच दिनांक 04 नोव्हेंबर रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. 04 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाही अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.