Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार;गुलाबराव पाटलांनी केले स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/10/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
Private: विटनेरची अख्खी ग्रामपंचायत शिवसेनेत : गुलाबराव पाटलांनी केले स्वागत

वावडदा / जळगाव(प्रतिनिधी) – म्हसावद येथिल प्रचार दौरा आटोपल्यावर विटनेर येथे ग्रा.पं.चे विद्यमान सरपंच स्नेहा ललित साठे, सोसायटीचे चेअरमन तथा माजी सरपंच ललित साठे शिवसेनेचे नेते तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तुत्व व झंझावाती नेतृत्वामुळे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे पुन्हा दिसून आले.

यांचा झाला प्रवेश
विटनेर हे गाव राजकीय दृष्ट्या निवडणुकीचे नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे. स्व. भिलाभाऊ सोनवणे यांच्यामुळे त्या कालखंडात विटनेर येथे प. स. सभापती, उपसभापती अशी विविध पद मिळाली होती. विद्यमान सरपंच स्नेहा ललित साठे, जळगाव पं. स. चे माजी सभापती हरिभाऊ साठे यांचे चिरंजीव तथा विकास सोसायटीचे माजी चेअरमन व माजी सरपंच ललित साठे, विद्यमान विकास सोसायटी चेअरमन व माजी सरपंच नितीन ब्रह्मेच्या (जैन ), तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबू दादा पिंजारी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून पालकमंत्री तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला तसेच म्हसावद येथिल भोई समाजाचे बापू भोई, युवराज धोत्रे, दिलीप शिरोळे , मोहम्मद शहा, रामा धोत्रे , प्रकाश धोत्रे, गोविंदा शिरोळे, लक्ष्मण धोत्रे, जितेंद्र भोई, हिरामण धोत्रे, गोविंदा शिरोळे, अजय भोई, अनिल शिरोळे, उदय धोत्रे, रोहिदास धोत्रे, मंगेश भोई, रामू शिरोळे , अशोक शिरोळे, संतोष धोत्रे, पिराजी शिरोळे, काढू धोत्रे, राहुल शिरोळे, भास्कर शिरोळे, अशोक शिरोळे, मुकेश शिरोळे, दशरथ धोत्रे, संतोष धोत्रे व सखाराम धोत्रे अश्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत गुलाबराव पाटील यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती साहेबराव वराडे, लाडक्या बहिण योजनेचे अध्यक्ष अर्जुन पाटील, पी. के पाटील , उपजिल्हा प्रमुख रवी कापडाने, अनिल भोळे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, दुध संघाचे रमेश आप्पा पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक नारायण चव्हाण, महेंद्र पाटील, बापू धनगर, गोविंदा पवार व अनिल भाऊ सोनवणे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

Next Post

वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजु मामा) उमेदवारी अर्ज दाखल करणार…

Next Post
वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजु मामा) उमेदवारी अर्ज दाखल करणार…

वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजु मामा) उमेदवारी अर्ज दाखल करणार...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo