<
जळगांव(धर्मेश पालवे):- शहरातील उच्चशिक्षित व उच्चम्भू घरातील 30 ते 35 मुलांच्या एका ग्रुपने शहरातील विविध बाबीवर आपल्या प्रामाणिक अनोख्या कार्याच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. शहरात ग्रासनाऱ्या विविध समस्यांवर आपले सर्व मित्र घेऊन साम- दाम सहित मदत रूपाने काम करतात. त्याच बरोबर गेल्या 8 दिवसापासून शहरातील स्वच्छता व आरोग्याशी संबंधित सर्व बाबीवर लक्ष केंद्रित करून एक एका रहदारीच्या, व्यावसायिक व दुकानदारी अथवा लोकसमूहांच्या ठिकाणी खराब झालेल्या भीती, मुताऱ्या, संडाशी, व भागात कचरा निर्मूलनासाठी च्या टँक आदी ठिकाणी स्वछता करत आहेत.ठीक ठिकाणी आपल्या समूहाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारे प्रेरक अस कार्य करत आहेत.काही चांगला मनात आणले तर जाणिवेने ते केल्यास अवघड वाटणारे काम ही चांगल्या प्रकारे होते असे हा ग्रुप समूह म्हणतो, त्याच बरोबर आम्ही कोणत्याही मदतीच्या व लाभाच्या अपेक्षा करत नसून, लोकांच्या आमच्याशी सलोख्याचे व मैत्री चे नाते तयार होत असून लवकरच शहर स्वछ करून विविध क्षेत्रात भरीव योगदान आम्ही देऊ असा विश्वासही या समूहाने व्यक्त सत्यमेव जयते कडे व्यक्त केला आहे.