<
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
सध्या विधानसभेचे राजकीय वातावरण खूपच तापले आहे. ज्याला त्याला त्याची पडली आहे. मात्र..विकास कामांच्या वलग्न करणाऱ्यांनी या 3 वर्षात शेतकऱ्यांना काय दिले? कोणत्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला जवळपास 3 वर्षापासून कपाशी मळा, केळी, ज्वारी या पिकांना मातीमोल भाव आहे.इकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत तर शेतकऱ्यांना शेतात मजूर मिळेणासा झालाय उघड डोळे….बघा नीट.
2013 मध्ये कापूस 7500/-क्विंटल रुपये प्रमाणे विकला जात होता आणि 2024 ला ही कापूस 5500 ते 6000- रुपये प्रति क्विंटल विकला जात होता… फरक इतकाच आहे 2013 मध्ये डीएपी 560/00 रुपयाला एक बॅग होती आज 1400/00 रुपयाला एक बॅग आहे.
तेव्हा कापूस वेचणी मजुरी तीन प्रतिकिलो रुपये किलो होती आज रोजी 12 ते 15 रुपये प्रति किलो आहे सर्वसामान्य जनता तेव्हा तेव्हा 390/00 रुपयाला गॅस भरत होता आज 1100 ते 1200 ला झालाय. ..
2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशीन सहसा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 11 लाख लागत आहे तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 55000 चा झालाय आधी 50000 मिळणारी मोटरसायकल ज्यावर लोक 60 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावोगावी चहा पावडर भांडी कपडे कुल्फी भेळ असे काही विकून उदरनिर्वासाठी दोन पैसे कमवत होते आज तीच गाडी एक लाख दहा हजार वर नेऊन ठेवली आहे पेट्रोल सरासरी 105 ते 110 वर गेलं साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही आहे इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेल्या जीएसटी या गोंडस नावाखाली कर वसुली जोरात चालू आहे या वाढलेल्या भाव वाढीमुळे सर्व सामान्य परिवाराच बजेट मात्र कोलमडले आहे. यातच तेलाचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींच्या घर खर्चाचं बजेट कोलमडला आहे.
धान्याचा काळाबाजार जोरात सुरू असून तरी त्यावर राजकीय मंडळी मूग गिळून गप्प बसले आहेत
अवैध धंदे गावागावात जोरात चालू आहे.
वरील सर्व वाढलेल्या किमतीच्या मनाने आज कापसाला काय भाव असावा सांगा ना आता का दातखिळी बसली खेड्यातील शेतकऱ्यांचे वास्तव . शेतकरी त्रस्त! !
शेतकऱ्यांनाच वाली कोणी नाय र…