<
अमोल जावळेंसोबत सेल्फी काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी केली मोठी गर्दी
यावल-(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दर महा दिले तेव्हा महाविकास आघाडीचे लोक थेट कोर्टात गेले, आणि आता त्यांच्या जाहीरनाम्यात आम्ही तीन हजार रुपये देऊ असं सांगताय, तेव्हा हे लबाडांचे आमंत्रण आहे. तुम्ही दक्ष राहा अशा शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या राज्याध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावरच प्रश्न उपस्थित करीत महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर टीका केली. त्या यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या.
महायुतीचे रावेर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी महिलांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत भाजपा महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्ष तथा आमदार चित्राताई वाघ यांनी या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केले. या जाहीर सभेत त्यांनी विरोधकांनी कशा पद्धतीने महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अडकाठी निर्माण केली.
लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टात गेले. आणि आता तेच म्हणताय की आम्ही देखील तीन हजार रुपये देऊ. तेव्हा हे लबाडांचे आमंत्रण आहे. यांच्या भूलथापाला महिलांनी बळी पडू नये असे आवाहन त्यांनी या सभेत केले. या सभेत भाजपा राज्य महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष जयश्री सोनवणे, डॉ.राजेंद्र फडके, केतकी पाटील, राष्ट्रवादी कॉग्रस अजीत पवार गटाचे उमेश नेमाडे, उमेदवार अमोल जावळे, भाजपा तालुका अध्यक्ष जयश्री चौधरी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष योगिता घोडके, शिवसेना तालुकाध्यक्ष पुजा पाटील, मिनाताई तडवी, जयश्री जावळे, रविंद्र नाना पाटील, यावलच्या माजी नगराध्यक्ष माधुरी फेगडे,रोहिणी फेगडे, पुनम पाटील,भारती पाटील, रावेर तालुकाध्यक्ष शिवसेना स्वाती भंगाळे, आशा सपकाळे सह महायुतीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. या सभेत यावल शहर व तालुक्यातून हजारोंच्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.
महिलांसाठी सक्षमीकरण योजना.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचे प्रश्न हे जातीने सोडवले. यात प्रामुख्याने उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या महिलांना सन्मानाने शौचालयाची उपलब्ध करून दिले जे काम काँग्रेसचे ७० वर्षात केले नाही ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले तसेच महिला सक्षमीकरण साठी राज्याचे महायुती सरकार देखील काम करत आहे जयश्री सोनवणे यांनी सांगीतले.
गरिबांचे कैवारी सरकार अनेक आरोग्याच्या योजना सुरू.
सदरचे महायुतीचे सरकार हे गरिबांचे कैवारी सरकार आहे. या सरकारने विविध आरोग्याच्या योजना सुरू केल्या. यामध्ये अनेक रुग्णांच्या कर्करोगसह हृदयरोगाच्या देखील मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याचे हित जोपासणारे हे सरकार आहे. या सरकारच्या विविध योजनांचा दिलासा सर्वसामान्यांना मिळाला आहे.
डॉ.सरोदे चित्रा वाघ यांची चौफेरी फटकेबाजी.
ज्या भावांनी तुम्हाला सन्मान दिला आत्मनिर्भर केलं त्या भावाच्या पाठीशी उभे रहा असे सांगत प्रत्येक महिलांना मी एक कानमंत्र देत आहे तो कानमंत्र त्यांनी आपल्या पतीला सांगा असे सांगत महिलांना त्यांनी ,खा कोणाचेही मटण मात्र, दाबा कमळचे बटन. असे सांगितल्यानंतर एकच हश्शा पिकल्या.
यावल शहर व मतदार संघाचा विकास.
शहरात च्या पाणीपुरवठा योजनेसाठीचा निधी मंजूर करून आणला आहे. शेळगाव बॅरेज प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. विकासाची बांधिलकी आहे. आपली स्वच्छ प्रतिमा असून माझ्या विरोधात विरोधकांकडे काहीही नाही म्हणून आगामी काळात कदाचित ते माझ्यावर काही ही चिखल फेक करू शकतात असे प्रसंगी उमेदवार अमोल जावळे यांनी संवाद साधताना सांगितले.
सभेला महिलांची अभूतपूर्व आणि उत्साही उपस्थिती होती. अमोल जावळेंसोबत सेल्फी काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी प्रेमळ उत्साहाने मोठी गर्दी केली. महिलांची ही लक्षणीय उपस्थिती सभेचे खास आकर्षण ठरली. सर्व लाडक्या बहिणींनी एकमताने अमोल जावळेंना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा दृढ संकल्प केला.